";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पाेलिसांचे आभार मानण्यासाठी 2 बहिणी न्यूझीलंडहून पुण्यात

पाेलिसांचे आभार मानण्यासाठी 2 बहिणी न्यूझीलंडहून पुण्यात

E-mail Print PDF

Add this to your website

 

To pay obeisance to the Police, 2 sisters coming from New Zealand to Pune

 • पुणे- पुण्यात २० वर्षांपूर्वी रस्त्यावर आढळलेल्या दाेन लहान बहिणींना एका पाेलिसाने सामाजिक संस्थेकडे साेपवले हाेते. न्यूझीलंडच्या एका दांपत्याने दोघांचे पालकत्व घेत त्यांना सोबत नेले. आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या पाेलिस हवालदार एस. के. कांबळे यांचे आभार मानण्यासाठी झीनत (२४) व रिमा साजिया (२३) या बहिणी न्यूझीलंडवरून पुण्यात आल्या आहेत. सीमा हिने भारतनाट्यमचे शिक्षण घेतले असून ती न्यूझीलंडमध्ये शिक्षिका आहे, तर रिमा इंजिनिअर आहे.

   

  मात्र, कांबळे हे निवृत्त झाले आहेत. यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. तरीही त्यांची भेट घडवून देण्यासाठी पाेलिस खाते कांबळे यांचा सध्याचा पत्ता व फाेन क्रमांक शाेधत आहेत. १९९८ मध्ये डेक्कन पाेलिस ठाण्याचे हवालदार एस. के. कांबळे यांना संजीवनी हाॅस्पिटलच्या पाठीमागे तीन वर्षांची सीमा व दाेन वर्षांची रिमा रस्त्यावर आढळली होती. कांबळे यांच्यासह पोलिसांनी त्यांच्या पालकांचा शोध घेतला. मात्र, मुलीचे पालक काही सापडले नाहीत. त्यामुळे दाेघींना ससून रुग्णालयातील श्रीवत्स संस्थेकडे साेपवण्यात आले. त्यानंतरही दाेघींच्या पालकांचा शाेध लागत नसल्याने बालकल्याण मंडळाने मुलींना दत्तक देण्याची घोषणा केली. प्रथम मुलींना भारतीय नागरिकांना दत्तक घेण्यासाठी प्राधान्य असते. मात्र, भारतीय नागरिक संबंधित मुलींना दत्तक घेण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे मुली न्यूझीलंडमधील दांपत्याने १९९९ मध्ये दत्तक घेतल्या. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी या दाेघी बहिणी त्यांच्या आई-वडिलांसह पुण्यातील ससून रुग्णालयातील साेफिश, श्रीवत्स संस्थेत दाखल झाल्या.

  मदत करणाऱ्या पोलिसाची भेट नाहीच 
  संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांच्याकडे मुलींनी आम्हाला संस्थेत काेणत्या पाेलिसांनी दाखल केले याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सहायक पाेलिस आयुक्त बाजीराव माेहिते व पाेलिस निरीक्षक भास्कर जाधव यांची भेट घेतली. पोलिसांनी नोंदीनुसार मुलींना माहिती दिली. पाेलिसांमुळे आम्हाला आई-वडील मिळाले. त्यामुळे नवे जीवन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पाेलिस कर्मचारी एस. के. कांबळे हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांची भेट मुलींना घेता आली नाही. मात्र, मुलींसाेबत भेट घडवून देण्यासाठी पाेलिस कांबळे यांचा सध्याचा पत्ता व फाेन क्रमांक शाेधत आहेत. 

   
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 47

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds