";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड

व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

  • पुणे- फेसबुकवरुन संपर्कांत आलेल्या 18 वर्षांपूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करत त्याची व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तो शिवाजी नगर अंबरनाथ ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. विश्वनाथ वाल्हे अस प्रियकराचे नाव असून तो फरार आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

    काही महिन्यांपूर्वी दोघे ही फेसबुक वरून संपर्कात आले होते.

    आरोपी विश्वनाथ वाल्हे आणि पीडित 38 वर्षीय महिलेचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. परंतु प्रेयसीचे लग्न झाले आणि ती उल्हास नगर ठाणे येथे गेली. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क नव्हता. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले दोघांनी एकमेकांचा नंबर घेत पुन्हा भेटण्यास सुरुवात केली. प्रियकर विश्वनाथ याने उल्हास नगर येथे प्रेयसीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर चिंचवड येथे आणून प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन इच्छे विरोधात शारिरीक संबंध ठेवत बलात्कार केला.

    याचे विडिओ चित्रीकरण करत फोटो देखील काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.फोटो आणि विडिओ भावाला आणि पतीला दाखवेल अशी धमकी देत एक लाख रुपयांची मागणी प्रियकराने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास विडिओ आणि फोटो सोशियल मीडियावर टाकण्याची धमकी त्याने 38 वर्षीय महिलेला दिली आहे. त्यामुळे अखेर चिंचवड पोलिसात पीडित महिलेने धाव घेत तक्रार दिली आहे. फरार प्रियकराचा शोध पोलिस घेत आहेत.

     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds