";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- किरकोळ कारणासाठी 17 वर्षांच्या सावत्र मुलीला बेदम मारहाण

किरकोळ कारणासाठी 17 वर्षांच्या सावत्र मुलीला बेदम मारहाण

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मोबाईल वापरते या किरकोळ कारणासाठी 17 वर्षांच्या सावत्र मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या नराधम बापाचा सध्या वानवडी पोलीस शोध घेत आहे. या मारहाणीमुळे खचलेल्या मुलीने 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा बाप फरार झाला असून तो अद्याप सापडलेला नाहीये. मुलीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने तक्रार दाखल केली असून यामध्ये तिने सावत्र बाप मुलीला सतत त्रास द्यायचा असे नमूद केले आहे.

आईने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की सावत्र बापाने तिच्या मुलीवर अनेक निर्बंध घातले होते. मोबाईल वापरायचा नाही, सरकारी कागदपत्रांवर आपले नाव वापरायचे नाही अशा निर्बंधांचा यामध्ये समावेश होता. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे कपड्यांचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी सावत्र बाप या दुकानावर आला होता, तेव्हा त्याने मुलीच्या हातामध्ये मोबाईल बघितला होता. यामुळे संतापलेल्या सावत्र बापाने तिला बेदम मारहाण केली होती आणि नियम पुन्हा मोडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सावत्र बापाचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि तिच्याबरोबर त्याने गुपचूप लग्नही केलं होतं. यामुळे तो आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईला देखील त्रास देत होता. पोलिसांनी या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे आत्महत्येला प्रवृत्त करणे, अलपवयीनाला मारहाण करणे आणि नियमबाह्य पद्धतीने लग्न करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 36

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds