";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या नवरदेवाला तरूणीने चांगलाच धडा शिकवला

गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या नवरदेवाला तरूणीने चांगलाच धडा शिकवला

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आवडलेल्या मुलीशी लग्न करायचेच म्हणून गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या नवरदेवाला तरूणीने चांगलाच धडा शिकवला आहे. तिचा पाठलाग करत घरी, ऑफिसमध्ये जाऊन तिच्यावर दबाव टाकला, नकार देऊनही सतत फोन करून मानसिक त्रास दिल्याने त्याच्यावर आणि वधूवर सूचक मंडळाच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय कुडतरकर (रा. बुधवार पेठ) याच्यासह भाग्यश्री वधू-वर सुचक मंडळाचे संचालक शानबाग या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरूणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कुडतरकर हा खानवळ चालवतो आणि मुलांना पेर्इंगेस्ट ठेवण्याचे काम करतो.

सुमारे दीड वर्षापूवी धनंजय कुडतरकरने एका कार्यक्रमात या तरूणीला पाहिले. ही तरूणीने भाग्यश्री वधू-वर सुचक मंडळात नाव नोंदविले असल्याची माहिती कुडतरकरला मिळाली. त्याने मंडळाचे संचालक शानबाग यांच्याशी ओळख वाढवून या तरूणीशी लग्न करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांच्यासोबत ठेवला. शानबाग यांनी कुडतरकरला तिच्या घरी घेऊन गेले, त्यावेळी तिने व तिच्या कुटूंबीयांनी त्याला लग्नास स्पष्ट नकार कळवलेला होता.

या तरूणीने नकार देऊनही कुडतरकर हा सतत तिचा पाठलाग करत, अनेकदा तिच्या घरी गेला, तिच्या ऑफिसमध्ये जाऊनही त्याने लग्नाची मागणी केली. मोबाईलवर वारंवार होत करत होता, त्याचा त्रास वाढत असल्याने तिने तिचा मोबाईल बंद करून टाकला. त्यानंतर त्याने घरी लँडलाईनवर फोन करून तिला त्रास देण्यास सुरूवात केली. या तरूणीने कुडतरकरकडे लग्न करावे यासाठी तिच्यावर शानबाग यांनी दबाव आणला होता. या त्रासाला कंटाळून अखेर तरूणीने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 17

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds