";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- उन्हाळ्याच्या तोंडावर बंधार्‍यातील पाणीसाठ्यात होणार वाढ रावेत बंधार्‍यातून गाळ काढला; अन्य उपायही सुरू

उन्हाळ्याच्या तोंडावर बंधार्‍यातील पाणीसाठ्यात होणार वाढ रावेत बंधार्‍यातून गाळ काढला; अन्य उपायही सुरू

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

पिंपरी-चिंचवड, दि. 7 : आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. पाण्याची टंचाई भासणार आहे व बंधार्‍यातील पाणीसाठाही वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने शहरास पाणी पुरवठा करणार्‍या रावेत बंधार्‍यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ केला असून आत्तापर्यंत 90 तास गाळ काढण्यात आला आहे. हे काम यापुढेही चालू राहणार असून यामुळे बंधार्‍यातील जलसाठ्यात वाढ होऊ शकेल. रावेत बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दापोडीतील यांत्रिकी विभागाची मदत घेतली जात आहे.

त्यांच्याकडील पोकलेनच्या साहाय्याने हे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम चालू आहे. गाळासोबत आतील खडक फोडण्यात येईल. त्यामुळे बंधार्‍याची पाणी साठवणक्षमता वाढून अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणार्‍या पाण्याचे अडथळे दूर होऊ शकणार आहे. काय आहे वस्तुस्थिती पवना नदीवरील रावेत येथील बंधार्‍यातून महापालिका, एमआयडीसी, पुणे महापालिकेची वाघोली पाणीपुरवठा योजना व हिंजवडीसाठी अशुद्ध पाण्याचा उपसा केला जातो. मात्र बंधार्‍यात गाळ साचला आहे, जलपर्णी वाढली असून आत मोठा खडकाळ भाग आहे.

यामुळे पाणी दुर्गंधियुक्त आहे. नदीचे पात्र पसरट व उथळ आहे. साचलेला गाळ कडेलाच साचून राहतो. त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सध्या केवळ एक दिवसच पुरेल एवढेच पाणी बंधार्‍यात साचून राहत असून पवनेतून रोज पाणी सोडण्याची वेळ येत आहे. जॅकवेल, मोर्‍या खुल्या करणे आवश्यक - जाणकारांचे मत दरम्यान या एकूणच समस्येवर जाणकरांकडूनही उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. बंधार्‍याच्या भिंतीलगत असलेले दोन जॅकवेल व बंधार्‍यातून पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग (मोरी) काँक्रीटीकरण करून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गाळही साचत आहे. उपाययोजना हीचकी, येथील जॅकवेल व दोन्ही मोर्‍या खुल्या केल्यास पाण्यासोबत गाळ वाहून जाईल आणि बंधार्‍यातील पाणी साठवण क्षमता वाढेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds