";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- देश चालवण्यासाठी आता अनुभवी नेतृत्व हवे

देश चालवण्यासाठी आता अनुभवी नेतृत्व हवे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

पिंपरी-चिंचवड, दि. 22 : जम्मु- काश्मिर येथील पुलावामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या बोलवलेल्या बैठकीत आपण बालाकोट हल्ल्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री सीतारामन या वेळी उपस्थित नव्हते, असा गौप्यस्फोट करत देश चालविण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी शरद पवारांचे वक्तव्य देश चालवण्यासाठी आता अनुभवी नेतृत्व हवे अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येथे सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव एकदाचे निश्चित झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांनी जोर धरला असून त्यांच्या प्रचाराचा नारळ पवार यांच्या हस्ते शिरूर मतदारसंघातील खेड येथे वाढवण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत पवारांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली. या वेळी पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, भाऊसाहेब भोईर, बबनराव भेगडे, मावळ लोकसभा मतदारसंघातील विशेषत: पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात पवारांनी राष्ट्रास आता अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले, नोटाबंदी, जीएसटी, काळापैसा वापसी या आणि अशा अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर विशेषत: कृषी धोरणांबाबत मोदी सरकार संभ्रावस्थेत आहे. अनेक अनुभवी व्यक्तींच्याकडून त्यांना चांगल्या सल्ल्याची गरज भासते आहे. राष्ट्रीय नेतृत्वाची ती उणीव आता भरून काढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. तरुणांना नेतृत्वाची संधी या निकषावर पार्थची उमेदवारी मावळसाठी दिली आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तो चांगली वाटचाल करेल, अशी आशाही पवार यांनी या वेळी व्यक्त केली. अन्य मान्यवरांचीही या वेळी भाषणे झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 10

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds