";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- फुले वाटताना काटेरी विचार करणारा गजाआड

फुले वाटताना काटेरी विचार करणारा गजाआड

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

फुले वाटताना काटेरी विचार करणारा गजाआड

 

निगडी, दि. 22 : अत्यंत किरकोळ कारणातून वाद होऊन त्याचे पर्यवसन हल्ल्यात होण्याच्या घटना वाढत असून, असाच प्रकार निगडीत नुकताच घडला. फुले खरेतर शुभेच्छांसाठी दिली जातात, पण तीच हल्ल्यास कारणीभूत ठरली. या बाबत येथील पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी गौतम जैन यांचे बंधू दिलीप जैन (महावीर पथ, प्राधिकरण) यांच्या घरी देवाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जैन यांनी पांडुरंग दत्तात्रय अवघडे (बालेवाडी, पुणे) या फुल विक्रेत्याकडे फुलांची ऑर्डर नोंदवली. मात्र काही कारणांनी ती त्यांनी रद्दही केली.

 

नोंदवलेली ही ऑर्डर रद्द का केली हे विचारण्यासाठी आरोपी जैन यांच्याकडे आला व त्याने दिलीप जैन यांच्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमीही झाले. दरम्यान जैन यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर रागावर नियंत्रण राहू न शकलेल्या या फूल व्यावसियाकास मात्र आपल्या सहकार्‍यांसमवेत कोठडीची हवा खावी लागत आहे. बदलत्या मानसिकतेचे हे विदारक चित्र चर्चेचा व विचार करायला लावणारे ठरत आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 10

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds