";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पावसाने सरासरी न गाठल्याने जलसंकट

पावसाने सरासरी न गाठल्याने जलसंकट

E-mail Print PDF

Add this to your website

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हाभरात दुष्काळाची दाहकता जाणवण्यास प्रारंभ झाला आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर जाणवण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच टँकरची संख्या 700 वर गेली आहे. आजमितीस 473 गावे व 2606 वाड्या- वस्त्यांवरील 10 लाख 77 हजार 172 नागरिकांची 700 टँकरच्या पाण्याने तहान भागविली जात आहे.

चालूवर्षी जिल्हाभर पावसाने हात आखडता घेतल्यो वार्षिक सरासरीही गाठली नाही. निळवंडे, भंडारदरा वगळता मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. जलसंधारण कामे होऊनही पाऊसच नसल्याने त्यात पाणी साठले नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावून त्यामुळे उपलब्ध असणारे जलस्त्रोत उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने भर हिवाळ्यातच जिल्ह्याच्या काही भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच टँकरने सातशेचा आकडा गाठला असून, जिल्ह्याच्या गेल्या सतरा वर्षाच्या इतिहासात टँकरचा आकडा साडेआठशेच्या वर गेल्याची नोंद नाही.

2015 मध्ये टँकरने 826 चा आकडा गाठला होता तर 2003 मध्ये 699 टँकर सुरू होते. 2012 मध्ये 707 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या 2 वर्षामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने टँकरची फारशी गरज भासली नाही. मात्र यंदा सरासरीच्या अवघ्या 69% पाऊस झाल्याने टँकरची संख्या उच्चांकावर जाऊन प्रथमच हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात दुष्काळामुळे नागरिकांना रोजगार नसल्यामुळे महिलांसह पुरुष मंडळीही टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. पाथर्डी तालुक्यात सगळ्यात जास्त पाणीटंचाईची झळ बसली असून, तेथे 106 गावे व 588 वाड्या-वस्त्यांवरील 2 लाख 24 हजार 176 नागरिकांना 139 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अली आहे. अद्याप श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून, जिल्हा प्रशासनाकडे टँकर सुरू करण्यासाठी 1 प्रस्ताव दाखल झाला असल्याचे समजते.

तालुकानिहाय टँकर

संगमनेर     46

अकोले       3

कोपरगाव     6

राहुरी       1

नेवासा     32

राहाता     4

नगर        56

पारनेर     136

पाथर्डी       139

शेवगाव      55

कर्जत      90

जामखेड    86

श्रीगोंदा     46

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 22

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds