";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- बारामतीला यंदा सुरुंग लागणार!

बारामतीला यंदा सुरुंग लागणार!

E-mail Print PDF

Add this to your website

बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा गड मानला जातो, मात्र यावेळी पवारांच्या गडाला आम्ही सुरुंग लावणार आहोत! देशात 350 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील असा विश्वास रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप व महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बारामतीच्या गडाला यावेळी आम्ही सुरुंग लावणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री आणि पुण्यातील उमेदवार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱहे, अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीकडून निवडणूक लढविली होती, पण त्यावेळी त्यांना कपबशी चिन्ह मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. जर त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असती तर ते निश्चित विजयी झाले असते. मात्र यंदा महायुतीकडून भाजपच्या बारामतीमधून कांचन कूल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना कमळ चिन्ह आहे. तेथील जनता त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघातही महायुतीचाच विजय होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट महायुतीला पाठिंबा द्यावा. ते आमच्यात आले तर ते आरएसएसच्या चौकटीत येतील असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दलित पँथर, लोकजनशक्ती पार्टी, दलित कोब्रा, लहूजी सेना, वडार संघटना, कोळी संघ, भोई समाज यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले. शहरातील दलित संघटना महायुतीच्या बाजूने असून त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेची माहिती बापट यांनी दिली.

एनडीएला 350 जागा मिळतील

2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर लढविली आणि ‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत मिळाले आणि यंदा आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवत असल्याने मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला 350 जागा मिळतील असा दावा आठवले यांनी केला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 3

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds