";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शहरातील रेड झोनचा प्रश्न

शहरातील रेड झोनचा प्रश्न

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

पिंपरी. दि. 8 : शहरातील रेड झोनचा प्रश्न भारतीय जनता पक्षानेच प्रथम शासन दरबारी मांडला असून तो आम्हीच सोडवू असा विेशास महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेस भेट दिली. त्यात रेडझोनचा प्रश्न आम्हीच सोडवू खासदार डॉ. अमोल कोल्हे व एकनाथ पवार यांच्यात श्रेयसंपादनाची स्पर्धा त्यांनी पक्षाने मागील पंचवीस वर्षांपासून केलेल्या येथील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच रेडझोन व अन्य काही प्रलंबित प्रश्नही आपण शासनदरबारी प्राधान्याने मांडून सोडवू असे स्पष्ट करतानाच युती शासन व मोदी सरकारच्या प्रयत्नांवर टीका केली. या पोर्शभूीवर श्री. पवार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,

सत्तारूढ भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांना घेऊन आपण स्वत: दिल्लीत संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी या प्रश्नाबाबात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉ. कोल्हेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण करताना त्यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष केले. बारामती लोकसभा मतदारसंघात या आधी पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. त्यावेळी खासदार म्हणून स्वत: पवार साहेब असतानाच हा प्रश्न का सुटला नाही? राष्ट्रवादीकडून पालिकेत ठेकेदार पोसण्याचे काम केले जात होते. आमचा भर याच ठेकेदारांकडून वेळेवर काम पूर्ण करण्यावर आहे. त्यामुळेच अनेक योजना व प्रकल्प मार्गी लागत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटून बोपखेल पुलाप्रमाणे रेडझोनचा प्रश्नही पाठपुराव्यातून मार्गी लावू अशा विेशास एकनाथ पवार यांनी व्यक्त केला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 28

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds