";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पुरात त्याने दिली रात्रभर मृत्यूशी झुंज, जाळीच्या साहाय्याने एकाच जागी रात्र काढली

पुरात त्याने दिली रात्रभर मृत्यूशी झुंज, जाळीच्या साहाय्याने एकाच जागी रात्र काढली

E-mail Print PDF

Add this to your website

 

पुणे - बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुनील शिर्के हे कामाहून पुणे-सातारा रस्त्यावरील गुरुराज साेसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील घरी आले. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू हाेऊन वीज गेल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. बाजूच्या आेढ्यातील पाण्याची पातळी वाढून दहा फुटांची संरक्षक भिंत आेलांडून पाणी साेसायटीत शिरू लागले. त्यामुळे खाली लावलेल्या दुचाकी, कार पाण्यात बुडू लागल्याने दुचाकी सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी ते इमारतीच्या खाली आले असता कमरेएवढे पाणी साठले हाेते. त्यामुळे लगबगीने दुचाकी बाजूला घेत असतानाच अचानक पाठीमागील आेढ्याची संरक्षक भिंत फुटली आणि पाण्याचा माेठा लाेंढा साेसायटीत शिरून हाहाकार उडाला आणि शिर्के पुराच्या पाण्यात वाहू लागले. पाण्यातून वाहत जाताना त्यांना सुदैवाने एका लाेखंडी जाळीचा सहारा मिळाला आणि जाळीच्या साहाय्याने त्यांनी एकाच जागी रात्र काढली.

शिर्के म्हणाले, मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. पुराच्या पाण्यात माझ्या दोन कार पाण्यात बुडत असल्याने त्या बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करत होतो. कमरेपर्यंत पाणी येऊ लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली हाेती. मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे नेमका पाण्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे पटकन दुचाकी बाजूला करून कार हलवाव्यात असा प्रयत्न मी करत हाेताे. त्याच वेळी पाण्याचे माेठे लाेंढे वाहत आल्याने साेसायटीची संरक्षक भिंत फुटली आणि पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून जाऊ लागलाे. पाण्यातून वाहताना मदतीसाठी आरडाआेरड करत हाेताे. परंतु माझा आवाज काेणापर्यंत पाेहोचला नाही. काही अंतरावर एक लाेखंडी जाळी हाताला लागल्याने ती पकडून मी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मदतीसाठी ओरडत याचना केली. मात्र, अंधारात मला काेणी पाहू शकत नव्हते. पहाटे चार वाजता मला एनडीआरएफच्या जवानांनी मला सुखरुप बाहेर काढल्याचे ते म्हणाले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 22

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds