";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- चिखलात बुडालेला संसार सावरण्याची पूरग्रस्तांची धडपड; काही संघटना, संस्था मदतीला धावल्या

चिखलात बुडालेला संसार सावरण्याची पूरग्रस्तांची धडपड; काही संघटना, संस्था मदतीला धावल्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

पूणे - पावसाच्या थैमानानंतर ओढ्या, नाल्यांचे पाणी ओसरले असले तरी काही भागात घराघरात साचलेला चिखल, दगडांचा खच, त्यात बरबटलेल्या जीवनावश्‍यक वस्तू अन॰ पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान पुण्यातील मांगडेवाडी ते नवी पेठेपर्यंतच्या भागात दिसत हाेते. बुधवारी रात्रीच्या पाऊस व पुराने या भागातील रस्तेही वाहून गेले आहेत. उशिरा का होईना, पुणे महापालिकेची यंत्रणाही कामाला लागली. स्वच्छतेसाठी २ हजार कर्मचारी नेमण्यात आले असून, ओढ्या-नाल्यांमध्ये पडलेल्या कार, दुचाकी बाहेर काढण्यासठी क्रेन, जेसीबीचा वापर सुरू आहे.

बुधवारी रात्री आभाळ फाटले. अवघ्या तीन तासांत पुण्यामध्ये हाहाकार माजला. या पावसाने सुमारे २० जणांचे बळी घेतले. सर्वच रस्त्यांवरून गुडघाभर पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. कात्रज, मांगडेवाडी, आंबेगाव, नऱ्हे, धायरी या डोंगराच्या कुशीतल्या ओढ्यांना पूर आला. हे पाणी पुणे शहराच्या दिशेने निघाले. यात सर्वात जास्त फटका आंबील ओढ्याच्या परिसरातील शेकडो सोसायट्या आणि वस्त्यांना. गुरुवारी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली नव्हती. शुक्रवारी महापालिकेकडून कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना नागरिकांच्या रोषाला जावे लागले. सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटीमधील तळमजल्यावरील सुमारे ५० फ्लॅटमध्ये चिखल साचला आहे. नाल्याची भिंती पडल्यानंतर प्रचंड पाण्याचा लोट थेट फ्लॅटमध्ये घुसला. यात खिडक्‍यांची तावदानेही तुटून गेली. या सोसायटीतील रस्ते वाहून गेले असून, चार ते पाच फुटांचे खड्डे पडले आहेत. फ्लॅटमधील चिखल काढण्यात महिला, मुले, वृद्ध सर्वजण व्यग्र होते. महापालिकेने जेसीबीने येथील माती, दगड, काढण्याचे काम सुरू होते.

केके मार्केटमध्ये व परिसरातील गल्ल्यांममध्ये प्रचंड चिखल जमा झाल्याने दुर्गंधी सुटली होती. येथे महापालिकेच्या यंत्रणेसह स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेऊन स्वच्छता सुरू केली होती. टांगेवाल, अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी येथील वस्ती आणि सोसायटीमध्ये महापालिकेची यंत्रणा अपुरी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. तेथील नागरिकांनी घरातील चिखल पातेल्यांनी बाहेर काढला. तर भिजलेल्या वस्तूही उन्हात वाळायला टाकल्या होत्या. इंदिरानगर येथील वस्तीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था कोलमडून गेली. घरांमध्ये, गल्ल्यांत चिखलच चिखल असून. तो उचलून रस्त्यावर टाकला जात होता. अशीच स्थिती सोपानकाकानगर, सुखसाखरनगर, लेकटाऊन, पर्वती पायथा, जनता वसाहत येथे होती. तिथेही मदतकार्य सुरू आहे.

नातेवाइकांकडे घेतला आश्रय

गुरुराज सोसायटी ही १९८६ पासून बांधलेली. एकूण २७५ घरे या ठिकाणी आहेत. पुराचे पाण्यात तळमजल्यावरील फ्लॅट पाण्याखाली गेले. त्यामुळे घरातील कपडे, सोफासेट, गाद्या, धान्य यासह सर्वच वस्तू चिखलात भिजल्या आहेत. घरात राहता येत नसल्याने अनेक जण नातेवाइकांच्या घरी मुक्कामासाठी गेले. रविप्रकाश साठे म्हणाले, ‘आम्ही हडपसरला नातेवाइकांकडे राहायला गेलो आहोत. सकाळी येऊन स्वच्छतेस सुरुवात केली. परंतु संपूर्ण घरात चिखल झाल्याने साफसफाई करणे अवघड झाले असून घरातील सर्व छाेट्या-माेठ्या गाेष्टी पाण्यात बुडाल्याने खराब झाल्यात.’

ना वीज ना पिण्याचे पाणी

ओढ्याला आलेल्या पुरामुळे सोसायट्यांमधील विजेच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये स्फोट झाल्याने वीज गेली आहे, ती अद्याप आलेली नाही. त्यामुळे दिवसा उजेड असेपर्यंतच घर साफ करता येत आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून पाण्याच्या बाटल्या, जार आणून दिले जात असल्याने तात्पुरती व्यवस्था झाली आहे. आराेग्य आणि पिण्याचे पाणी या मूलभूत गाेष्टी असून त्या प्रथम मिळाव्यात, वीज नंतर मिळाली तरी चालेल, असे मत पुराचा फटका बसलेल्या भागातील रहिवाशांनी व्यक्त केले.

भंगार झालेल्या वाहनांसाठी टोइंग

पूरग्रस्त भागात आणि आेढ्यात अडकलेल्या चारचाकी वाहनांच्या चाकांमध्ये, इंजिनमध्ये, सीटवर गवत, झाडाच्या फांद्या, प्लास्टिक, दगड असा कचरा जाऊन बसला आहे. त्यामुळे या गाड्या सुरू होत नसून, ही वाहने टाेइंग करून गॅंरेजला येण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू आहे. गाड्या पाण्यात राहिल्याने वाहनांचे माेठे नुकसान झाले असून अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. निसर्गाच्या काेपाने वाहनांचे नुकसान झाल्याने विमा मिळेल का? शासकीय मदत तरी मिळेल का? अशी चिंता लागल्याचे सुमीत देशमुख यांनी सांगितले.

दाेन हजार कर्मचारी स्वच्छतेसाठी

ओढ्याचे पाणी घुसून चिखल झाला आहे अशा ठिकाणी शुक्रवारपासून स्वच्छतेसाठी २ हजार कर्मचारी कामासाठी नेमले आहेत. सोसायट्यांमधील राडारोडा काढण्यासाठी, नाल्यातील वाहने बाहेर काढण्यासाठी, कचरा वाहतुकीसाठी १७७ वाहने आहेत. यात जेसीबी, क्रेन, हायवा, डंपर आदी वाहने आहेत. या भागात लवकरात लवकर स्वच्छता करून तेथे रोगराई पसरू नये यासाठी वस्त्या, सोसायट्यांमध्ये औषध फवारणी केली जात आहे. सौरभ राव, महापालिका आयुक्त, पुणे

अतिक्रमणांना प्रशासन, लाेकप्रतिनिधी जबाबदार

आेढ्यांच्या किनारी बांधली जाणारी संरक्षक सिमेंटची भिंत, आेढ्यात टाकला जाणार राडाराेडा, कचऱ्याचा ढिगारा, सिमेंटचे रस्ते, पादचारी मार्गावरील सिमेंटचे ब्लाॅक यामुळे पावसाचे पाणी जिरण्यास किंवा वाहण्यास अडथळे निर्माण हाेतात. आेढ्याच्या बाजूची अतिक्रमणे याकडे वेळाेवेळी प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींनी केलेली डाेळझाक यामुळे अचानक पूरसदृश परिस्थिती आेढवली. ओढ्याची संरक्षण भिंत कमकुवत बांधली जात असून त्या पुन्हा बांधताना पक्क्या बांधल्या पाहिजेत. सुनीता पेंडसे, पर्यावरण कार्यकर्त्या

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 118

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds