";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अ‍ॅड. रवींद्र दाभाडे - एक व्हीजन असलेले नेतृत्व

अ‍ॅड. रवींद्र दाभाडे - एक व्हीजन असलेले नेतृत्व

E-mail Print PDF

Add this to your website

तळेगावातील एक अभ्यासू, दूरदृष्टी व निश्‍चित ध्येय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अ‍ॅड. रवींद्रनाथ जयवतंराव दाभाडे. प्रत्येक वर्षाच्या वळणावर असताना हमखास भेटणार सुखद क्षण म्हणजे वाढदिवस! आज 27 जून रोजी आपला वाढदिवस. प्रथमत: या वाढदिनाच्या आपणास भरभरून शुभेच्छा! अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात वृत्तपत्र वाटण्याचे कामदेखील केले. आपल्याला कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची कायम जाणीव होती. नगरपालिकेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे इंद्रायणी महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर पुण्याच्या लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केली. लॉ कॉलेजला असताना शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते लॉ कॉलेज हे अंतर पळत जावून कॉलेजमध्ये पोहोचायचे’,

अशी आठवण ते सांगतात. शालेय जीवनातील क्रीडा गटात प्रथम क्रमांक मिळवणारे अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांनी कुस्ती क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले होते. मूर्ती लहान पण कीर्ती महानया उक्तीप्रमाणे त्यांनी युनिर्व्हसिटी नॅशनल चॅम्पियनहा राष्ट्रीय पातळीवरचा कुस्तीचा किताब मिळवला होतो. सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक व बक्षीस हे जूळून येत गेले होते. पुढे सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जीवनात कार्य करतान तरुण कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे केले. अमरहिंद मित्र मंडळाची तळेगाव स्टेशन चौकात स्थापन करून अनेक तरुणांध्ये कुस्ती व व्यायामाची आवड निर्माण केली. एक चांगली इमारत व अतिशय अद्ययावत अशी व्यायामशाळा आज या ठिकाणी उभी आहे.

शेकडो तरूण त्याचा दररोज लाभ घेत आहेत. याच संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी तळेगावमध्ये जिल्हा पातळीवरील कब्बडी स्पर्धांचे अनेक वर्षे यशस्वी आयोजन केले. पुढे आर्थिक सहकार क्षेत्रात कार्य करण्यासाठी दि. 11-02-1998 रोजी मा. उपनगराध्यक्ष गिरीश खेर, सुरेंद्र आगरवाल, शंकरराव शेळके, राजेंद्र सरोदे, प्रदीप पवार, राजुशेठ राठी, महादेव वर्तले, सदानंद धोत्रे इत्यादी सहकार्‍यांना बरोबर घेवून आज नावारूपास आलेल्या हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. सुरवातीस एका खोलीत असणारी ही पतसंस्था वर्षाभरात एका प्रशस्त प्लॅटमध्ये स्थलांतरीत झाली.

माजी पतंप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन व मा. नगराध्यक्ष कै. नथुभाऊ भेगडे पाटील व माजी उपनगराध्यक्ष कै. जयवतंराव दाभाडे पाटील यांना आदर्श मानून संस्था कार्य करीत आहे. आज पतसंस्थेची स्वमालकीची भव्य अशी 3 मजली, 5000 स्के. फूटाची इमारत असून एका मजल्यामध्ये पतसंस्थेचे अत्याधुनिक, कॉम्प्युटराईज कार्यालय असून इतर दोन मजले बँक व इतर व्यावसायिक संस्थेस भाड्याने दिले आहेत. संस्थेकडे सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा असून अशी सुविधा असलेली तालुक्यातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे.

संस्थेला खडज: 9001 - 2008 हे नामांकन प्राप्त झाले असून संस्था सतत ऑडीट वर्ग मध्ये आहे. नुकतेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारून संपूर्ण पुणे जिल्हा असे कार्यक्षेत्र मिळाले आहे. आपल्या ठेवी या संस्थेत सुरक्षीत राहतात या भावनेतून नागरिकांचा ठेवी ठेवण्याचा ओघ वाढत आहे. आज सर्वसामान्य टपरीधारक किरकोळ दुकानदार, रिक्षाचालक ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांना सुरक्षित पतपुरवठा करून त्यांची समाजातील पत वाढविण्याचे काम हिंदविजय पतसंस्था करीत आहे; आणि आपल्या सभासदांना सातत्याने 12 ते 15% लाभांश देत आहे. हे सर्व शक्य झाले ते अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे यांच्या नेक्या नियोजनामुळे, मार्गदर्शनामुळे. कामशेत येथील कामशेत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ही संस्था दोन वर्षांपूर्वी अडचणीत आली. सततच्या तोट्यामुळे सहाय्यक निबंधकांनी सभासदांचे हित जपण्यासाठी संस्था दुसर्‍या संस्थेत विलीन करा असे सांगितल्यानंतर त्या संचालक मंडळाने प्रथम हिंदविजय पतसंस्थेस प्राधान्य देवून कामशेत नागरी सह. पतसंस्था हिंदविजय पतसंस्थेत विलीनीकरण करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला. अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांनीही तोट्यात असलेली ही संस्था विलीनीकरण करून घेण्याच्या प्रस्तावास अनुकूलता दाखवून हिंदविजय पतसंस्थेच्या वार्षिक सभेस त्यास मंजूरी मिळवली व एक वर्षभरात ती संस्था प्रशस्त जागेत स्थलांतर करून नफ्यामध्ये आणली. ते स्वत: वकील असले तरी त्यांनी वकीलीतील व्यावसायिकेला नेहमीच कमी महत्त्व दिले. आजही सकाळी त्यांचे ऑफिस पक्षकारांनी भरलेले असते. तालुक्यातील गोर-गरीब नागरिक असतील, शेतकरी असतील यांची कामे पैसे नसतील तरी केस चालवणार वकील म्हणून लोक त्यांचेकडे येतात.

राजकारणातही नानांनी अनेक चढउतार पाहिले. नगरसेवकापासून तळेगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी अतिशय यशस्वीपणे भुषवले एक अभ्यासू आणि जनतेची कामे करणारा, जनतेशी सहज संवाद साधणारा नगरसेवक म्हणून ते ओळखले जातात. राजकारणातील पराभवही अतिशय खिलाडूपणे स्वीकारण्याचे एक उदाहरण त्यांचे जवळचे मित्र निजामभाई काजी यांनी आम्हाला सांगितले. म्हाळसकरवाडीराजगुरु कॉलनी वॉर्डधून 2000 सालच्या निवडणूकीत अरुण पवार विरुद्ध अ‍ॅड. रवींद्र दाभाडे अशी अटीतटीची लढत झाली होती. नानांना विजयाचा विेशास होता.

परंतु मतमोजणी झाल्यानंतर अतिशय कमी मतांनी नानांचा पराभव झाला होता. निकालाच्या दुसर्‍याच दिवशी नानांनी निजामभाईंना बोलावले व स्कूटरवर बसून आपल्याला अरुण पवारांकडे जायचे आहे असे सांगितले. पराभवाचे दु:ख व निवडणूकीचे वातावरण यामुळे निजामभाईंना वाटले आता बहुतेक भांडणे होणार, नाहक डोकी फुटणार. परंतु तेथे गेलो तर नानांनी स्कूटरच्या डिक्कीतून पेढ्याचा पुडा व हार काढला आणि अरुण पवार यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. अशी खेळाडू वृत्ती फारच थोड्या लोकांकडे असते. अशा धुरंधर व्यक्तीमत्त्वाचा व्यक्तीमत्त्वाचा वाढदिवस म्हणजे समाजासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करण्याचा उत्सवच! म्हणूनच यावर्षी क्रीडाक्षेत्रात विद्यार्थ्यांना वाव मिळण्यासाठी श्री क्षेत्र भंडारा चढणे (रनिंग) स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 25 जून रोजी करण्यात आले आहे.

तर जीएसटी वस्तू व सेवा कर कायदा या विषयावर दि. 26 जून रोजी कामशेत येथे तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच मावळातील गोरगरीब जनतेला विविध आजारांवरील उपचारासाठी मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर दि. 27 जून रोजी कामशेत येथे स्पर्श हॉस्पिटलसोाटणे फाटा यांचे सहयोगाने आयोजित केले आहे. मा. संस्थापक रवींद्रनाथ दाभाडे यांचे वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम राबविण्याची संधी आम्हा कार्यकर्ते व पतसंस्थेला लाभत असते. पुन:श्‍च एकदा हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळी कर्मचारी व दै. बचत प्रतिनिधी यांचे तर्फे नानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 189

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds