";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तुलसीवीण ज्याचे घर..ते तव जाणावे अघोर!!

तुलसीवीण ज्याचे घर..ते तव जाणावे अघोर!!

E-mail Print PDF

Add this to your website

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोप-यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरला आपले माहेर म्हटले जाते. आणि विठ्ठल - रुक्मिणीला आपले आई - वडील’. वारकरी संप्रदायात अजून एका गोष्टीला फार महत्व आहे. ते म्हणजे तुळशी वृंदावन आणि तुळशीची माळ आणि त्याचे तेवढे महत्व पण आहेच. तुळशीचे पान, खोड, बी, सर्वच औषधी आहे. ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध असते. तुळशीचा स्पर्श प्रचंड ऊर्जा देतो. नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख- समृद्धी प्राप्त होते. तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते. तुळशीच्या उत्पत्तीबद्दल पुराणात काही कथा सांगितल्या आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. आणि त्यातून तुळस निर्माण झाली. पुढे ती ब्रह्मदेवाने विष्णूस अर्पण केली.

तिच्यामध्ये सर्व देवतांचे वास्तव असते. तुळस ही त्याग आणि समर्पण दर्शविणारी वनस्पती आहे. पुराणात श्रीकृष्णाची तुला केली तेव्हा एका पारड्यात सोने व दुसर्‍या पारड्यात भगवान श्रीकृष्ण बसले. तेव्हा तराजू समपातळीवर येईना. म्हणून रुक्मिणीने तुळशीपत्र मनोभावे अर्पण करताच श्रीकृष्णाची सुवर्णतुला भरून झाली. आपण कोणालाही दक्षिणा देताना त्यावर तुळशीपत्र ठेवून आपली त्यामागची भावनाच दर्शवितो. तुळशीचे 5 प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, रामतुळस, बाबी तुळस आणि तुकाशीमीय तुळस. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. वारकरी संप्रदायात प्रवासाला जाताना तुळशीला उजवीकडून प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो अशी समजूत आहे.

तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही. आयुष्यातील कर्तव्य - कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून वारकरी सांप्रदायात गळ्यात तुळशीची माळ धारण करणे आवश्यक आहे. वारकरी दीक्षा घेताना गळ्यात घातलेली माळ जर काही कारणामुळे तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालेपर्यंत वारकर्‍याला अन्न घेता येत नाही. ज्या घरात तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जी व्यक्ती तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचे स्मरण करते ती जन्म - मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते. या सर्व गोष्टीमुळे वारकरी संप्रदायात तुळशीला व तुळशीच्या माळेला खूपच महत्व आहे.

सौ.प्रगती प्रवीण रुकारी

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 38

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds