";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सात्विक सुगंध (कै.सौ. सुधाताई अंबिके)

सात्विक सुगंध (कै.सौ. सुधाताई अंबिके)

E-mail Print PDF

Add this to your website

 

आयुष्यभर सेवाव्रतात रममाण होणार्‍या काही सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. त्यांचे जगातून निघून जाणे मनाला चटका लावणारे असते. अशाच एका व्यक्तीचे नाव आहे सौ. सुधाताई पुरुषोत्तम अंबिके! सुधाताई या पूर्वाश्रमीच्या सुधा लक्ष्मण गोटखिंडीकर. एकनाथ षष्ठीला 22 मार्च 1938 ला त्यांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये पूर्ण केले जे त्या काळात क्रांतिकारक होते. काही काळ त्यांनी नोकरी केली. पुण्याच्या पुरुषोत्तम ऊर्फ  राजाभाऊ अंबिके यांच्याशी 15-2-63 रोजी विवाह झाला. खादी ग्रामोद्योग बोर्डात त्यांनी शेवटपर्यंत मनोभावे नोकरी केली.

पती व्यवसायात असल्याने घर सांभाळून, आल्यागेल्याचे आदरातिथ्य करूनही नोकरी सांभाळली. वास्तविक खडकीच्या बाजूला मरीआई गेटकडे नोकरीचे ठिकाण. परंतु कसलीही तक्रार न करता दररोज लांबवर जा-ये करूनही उत्तम प्रपंच केला. जगाचा निरोप घेताना (19-6-16) त्यांचे वय 79 वर्षांचे होते. पदरी मूलबाळ नसले तरी सुधाताईंनी खंत बाळगली नाही. येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला खायला दिल्याशिवाय, चहा पाजल्याशिवाय कधीही सोडले नाही. सतत दुसर्‍यासाठी करीत राहणे हाच त्यांचा धर्म! पुन्हा कुठेही पुढे-पुढे करणे नाही, वाद-विवाद नाही! सर्वांना सतत हव्या-हव्याशा वाटणार्‍या सुधाताईंनी लग्नाला 54 वर्षे झाल्यानंतर अहेवपणे जगाचा निरोप घेतला.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 65

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds