";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- तळेगावातील तळ्याचे सुशोभीकरण

तळेगावातील तळ्याचे सुशोभीकरण

E-mail Print PDF

Add this to your website

तळेगावातील ईगलमागील तळे गेली अनेक वर्षे दुर्लक्षित होते. आता त्याला ऊर्जितावस्था येत आहे. यात सोडलेले गटारांचे पाणी जर बंद झाले तर त्यातील प्रदूषण नक्कीच थांबेल. त्या तळ्याच्या पाणलोट क्षेत्रात झाडे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे असे दिसते. या तळ्याची किंवा सर्वच तळ्यांची मुख्य समस्या आहे, त्यामध्ये साचणारा गाळ. किंबहुना आपल्याकडच्या सगळ्याच धरणे, तळी यांची हीच समस्या आहे. तो गाळ दरवर्षी येतच राहतो. आपण त्यासाठी योग्य काळजी घेत नाही. हा गाळ येऊ नये म्हणून कोणती झाडे किती अंतरावर लावावीत याचे काही शास्त्र आहे.

ही झाडे लावताना आता देशी झाडे लावावीत हे लोकांना समजले आहे. त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. ही झाडे गाळाला अटकाव करण्यासाठी काही वर्षे लागतात आणि त्यामुळे गाळ येण्याची क्रिया चालूच राहते. त्यामुळे गाळ काढण्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागते. हा काढलेला गाळ काठावरच टाकला जातो. त्यात गैर काही नाही. फक्त तो गाळ पुन्हा तळ्यात किंवा प्रवाहात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निसर्गाने आपल्याला मदत केली आहे. योग्य झाडे योग्य अंतरावर लावणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी गेल्या 45 वर्षांच्या अनुभवातून व लोकांच्या जगभरातील अनुभवावर आधारित एक योजना सुचवत आहे. पावसाळ्यातील पाणी पातळी रेषा लक्षात घेऊन त्याबाहेर दर 6 फुटांवर एक बांबू रोप लावावे. दोन बांबूंध्ये एक देशी वृक्षांची ओळ लावावी.

पावसाळा संपता संपता त्यामधील रिकाम्या जागेत गवताचे बी टाकावे. बांबू स्थिरावण्यासाठी एक हंगाम लागेल. तोपर्यंत गवत स्थिरावते, पुढील पावसाच्या येण्यापूर्वी फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात तेथीलच पाणी घातले तर बांबू स्थिरावतो. जानेवारीनंतर बांबूला पाणी लागत नाही. हे स्थिरावलेले गवत, माती पूर्णपणाने धरून ठेवते. त्यानंतर बांबू त्याची मुळे फार खोल जात नाहीत पण माती धरून ठेवण्याचे काम वर्षानुवर्षे  करीत राहतो. यामध्ये लावलेले देशी वृक्ष पक्ष्यांना आश्रय देतात आणि निसर्गाची सायकल पूर्ण करायला मदत करतात. हे पक्षी त्या परिसरातील वृक्ष वाढवण्यासाठी मदत करतात. गवत व बांबू माती हलू देत नाही. बांबूुळे तळ्यात येणारे पावसाचे पाणीदेखील गाळून येते. यामध्ये अनेक गोष्टी साध्य होतात.

गाळ येण्याचे थांबते. आजचे भकास दृश्य बदलून तळे परिसर हिरवेगार होणे, पाणी स्वच्छ राहणे, चांगला पिकनिक स्पॉट होणे. याबरोबर यामध्ये लावलेल्या बांबूधून होणारा आर्थिक लाभ हा खूप काही देणारा आहे. बांबूचे एक बेट चौथ्या, पाचव्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात करते. महत्त्वाचे म्हणजे बांबू हे गवत आहे व ते दरवर्षी कापावे लागते. आपल्या वृक्षतोड नियमात हे मान्य केले आहे. एक बांबूचे बेट 4 वर्षानंतर 3-4 बांबू देतात. आठव्या वर्षापासून (येथे मी तळ्याकाठचे बांबू म्हणतो आहे) पुढील 40-50 वर्षे दरवर्षी किमान 20-25 बांबू देतात. याचा दर जर 40 रुपये धरला तर एका बेटातून आठव्या नवव्या वर्षापासून 1000 रुपये देऊ शकतात.

अनेक शेतकरी हे करताहेत. जर 5000 बांबू लावले तर किती पैसे होतात हे सांगायला नको. या पैशावर वृक्ष प्राधिकरणाचा बराचसा खर्च पूर्ण भागू शकतो. जर तळेगावातील सर्व तळी, सर्व ओढे, नाले असे वापरले गेले तर बांबू हा तळेगावचा प्रतिष्ठेचा विषय बनेल. जर नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व जमिनीवर अशा पद्धतीने लागवड केली तर यापासून वीजनिर्मिती करणे शक्य आहे. किंवा औद्योगिक अल्कोहोल तयार करणे शक्य आहे. सरकार आता असे प्रोत्साहन देत आहे. त्याचा तळेगावकरांनी फायदा घ्यावा ही अपेक्षा. आपल्या जवळ खडकवासला धरणाच्या मागे हे कर्नल पाटील यांनी करून दाखवले आहे. उत्सुकता असणार्‍यांनी हे पाहून यावे. अधिक माहितीसाठी मी केव्हाही उपलब्ध आहे. हेंमत बेडेकर

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 201

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds