";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

पर्यावरण

E-mail Print PDF

Add this to your website

 

पर्यावरण हा शब्द आता सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. पर्यावरणाच्या समस्याही आता आपल्याला समजू लागल्या आहेत. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी, हवा, जमीन, वृक्ष यांना दूषित करू नये असा पर्यावरण संरक्षणाचा अर्थ. मात्र यासाठी नुसते माहीत असणे उपयोगाचे नाही तर त्यासंबंधात कृती करणं हाच त्यावरचा खरा उपाय आहे. या संदर्भात माझ्या वाचनात एक छोटेसेच पण अतिशय उपयुक्त पुस्तक आले. पर्यावरण संवर्धनाच्या अनेक पद्धती, कृती त्यात लेखकाने सांगितल्या आहेत.

हरित संदेशअसे पुस्तकाचे नाव असून दिलीप कुलकर्णी हे त्याचे लेखक आहेत. लेखक स्वत: कुडावळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे रहात असून ते त्यांचे सर्व कुटुंबीय पर्यावरणपूरक जीवनशैली जगतात. बोले तैसा चालेया वचनाचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून येतो. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक अर्थपूर्ण कविता लिहिली आहे. तिची सुरुवातीची ओळ - पोराबाळांसाठी आपल्या काहीतरी शिल्लक ठेवा रं! संपवून टाकू नका रं!या ओळीवरून पुढील कवितेची कल्पना आपल्याला करता येईल. हे सर्वच पुस्तक वाचनीय असून कृती करण्यास प्रेरणा देणारे आहे. ते मुळातूनच वाचले पाहिजे.

हल्ली काही मंडळं पुस्तक-हंडीचा उपक्रम करतात. भगिनी संक्रांत वाण देतात. त्यांनी त्यात या पुस्तकाचा समावेश जरूर करावा. मुंजा मुलालाही हे पुस्तक द्यायला हरकत नाही. त्याच्या पालकांनी पुस्तकातील विचार सोप्या शब्दात मुलाला समजावून द्यावे व स्वत:ही कृतीत आणावे. 5 जून हा पर्यावरणदिन मानला जातो. पण खरं तर पर्यावरण रक्षण सदा सर्वकाळ सातत्याने केले पाहिजे. तरच त्याचा थोडाफार परिणाम दिसेल. अशिक्षित समाजात त्यादृष्टीने थोडे प्रचाराचे कामही केले पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर हा सध्या अति प्रमाणात वाढला आहे. आकर्षक व सुटसुटीत वेष्टन म्हणून ते सर्वांना सोयीचे वाटते. पण प्लॅस्टिक अनेक वर्ष कुजत नाही. ते माती व पाणी या ठिकाणी साचून राहते हा त्याचा मोठा दोष आहे.

अर्थात आपणप्लॅस्टिक सर्वस्वी टाळू शकत नाही. पणत्याचा पुनर्वापर व मर्यादित प्रमाणात वापर करू शकतो. प्लॅस्टिकने केलेले अनर्थ आपल्याला माहीत आहेतच. म्हणून थोडी खबरदारी घेतली पाहिजे. पुण्यातल्या एक वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. हेा साने या पूर्णपणे पर्यावरणपूरक जीवनशैली जगत होत्या. आपल्या घरात त्यांनी वीजजोड घेतला नव्हता. कंदिलाच्या उजेडातच सर्व कामे करीत. लेखन-वाचनासाठीही कंदिलाचाच उजेड त्या वापरत. अशी तत्त्वनिष्ठ माणसं विरळाच असतात. पण माझ्या एका माजी विद्यार्थ्याचं उदाहरण येथे देते. तो पुण्यात राहतो. त्याचं नोकरीचं ठिकाण घरापासून पर्यावरण रक्षण करूया थोडं दूर आहे.

पण तेथे पोचण्यासाठी तो सायकल वापरतो. प्रदूषण टाळावं म्हणून. त्याच्याकडे गाडी आहे. त्याला हे जमतं तर इतरांना का जमू नये? निदान थोड्या अंतरासाठी तरी सायकलच वापरावी. आता पर्यावरण रक्षणासाठी मी स्वत: व माझ्या घरचे लोक काय करतात ते सांगते - 1) ओला व सुका कचरा कटाक्षाने वेगवेगळा ठेवतो. 2) कागदावरील जाहिरातीच्या कोर्‍या भागाचा उपयोग रफ लेखनासाठी करतो. 3) पाठकोर्‍या कागदाचे आटोपशीर तुकडे करून ते स्टेपल करतो व त्यावर किराणाची यादी, निरोप, तात्पुरते फोन नंबर्स लिहितो. पाठकोर्‍या कागदाच्या लांब पट्ट्या कापून डब्यातले जिन्नस कळावे म्हणून आतील पदार्थाचे नाव लिहून डब्याला अडकवितो. 4) भाजी व वाणसामानासाठी कापडी पिशवी जवळ ठेवतो.

 

5) डाळ, तांदूळ, भाजी, फळे, धुतलेले पाणी एका बादलीत जमा करून ते कुंड्यातील झाडांसाठी वापरतो. 6) चहाचा चोथा गुलाबाच्या झाडाच्या व इतर झाडांच्या मुळाशी टाकतो. 7) घराला गच्ची आहे त्यामुळे सूर्यचूल वापरता येते. 8) हवे असतील त्याच खोलीतले दिवे व पंखे चालू करतो. 9) विशेष प्रसंगी जेवणाच्या ताटाभोवती सजावट करायची असेल तेव्हा ताज्या पानाफुलांचा वापर करतो. 10) पाटीवर पेन्सिलने निरोप, कामांची यादी लिहितो. यातील बर्‍याचशा गोष्टी सर्वांना करता येण्यासारख्या आहेत. वीज, पाणी, इंधन यांची बचत करणे ही काळाची गरज आहे. सध्या माणसाचे जीवन खूपच गतिमान झाले आहे. वेळ नाहीया कारणाने आपण विजेवर चालणारी उपकरणे पटकन वापरतो.

पण शक्यतो बचतीचे मार्ग शोधले पाहिजेत. पूर्वीचे सायकलीचे पुणेआता इतिहासजमा झाले आहे. शाळांधून पाटीचे उच्चाटन झाले आहे. त्याजागी कागदाचा वापर वाढला आहे. तरीही घरात पाटी वापरायला हरकत नाही. निसर्गात न कुजणारे असे काहीच नसते. निसर्गाची एक पद्धतशीर पर्यावरणसाखळी असते. माणूस मात्र प्लॅस्टिक, थर्माकोलसारखे न कुजणारे पदार्थ निर्माण करतो. चैन व सोय या नावाखाली प्लॅस्टिक कचरा निर्माण करतो. पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवणार आहोत? तेव्हा सावध ऐका, पुढल्या हाकाहे लक्षात घेऊन पृथ्वीमातेला शुद्ध, स्वच्छ ठेवू या.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 250

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds