";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

शिक्षण

E-mail Print PDF

Add this to your website

 

सुशिक्षित माणूस हा पैलू पाडलेल्या हिर्‍यासारखा आयुष्यभर चमकत असतो. मात्र ती चमक कायम जपणे ही त्या माणसाची नैतिक जबाबदारी असते. सध्या विद्यालयांची संख्या वाढत आहे. विद्यार्थीसुद्धा भरपूर शिक्षण घेत आहे. परंतु शिक्षणातून मिळालेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर किती जण करत आहेत, हाही एक सामाजिक प्रश्न आहे. विभक्त कुटुंबपद्धती, बदलती जीवनशैली, जीवघेण्या स्पर्धेध्ये कामाचा ताण व त्याचा कुटुंबावर होणारा विपरीत परिणाम हे आज सर्वत्र दिसणारे चित्र. आई-वडिलांनी स्वत:च्या करिअरच्या मागे लागून मुलांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे अनेक भयावह परिणाम दिसू लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीत माणूस घडविणारे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळेत गणितं व्यवस्थित सोडवणारे विद्यार्थी भावी जीवनामध्ये आई-वडिलांना बरोबर घेऊन त्यांच्या जीवनातील गणितं कितीजण सोडवतात हाही एक प्रश्न आहेच. कारण वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हे स्वत:ला सुशिक्षित समजणार्‍यांना शोभनीय नाही. सध्याच्या परिस्थितीत नैतिक मूल्यांची घसरण होत असून माणूसकी हरवत चालली आहे. भ्रष्टाचारासारखे प्रश्न गंभीर होत आहेत. समाजात विषमता आहे, हे सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांध्ये नैतिकता निर्माण करणे व त्यांना चांगला माणूस घडविणारे शिक्षण देण्याची गरज आहे. शाळा कॉलेजमध्ये निवडणुका अजिबात घेऊ नये. कारण विद्यार्थ्यांध्ये भीतियुक्त वातावरण तयार होऊ शकते. निवडणुका घेण्यापेक्षा अध्यात्माचे धडे दिले तर विद्यार्थ्यांध्ये नैतिकमूल्ये तयार होऊ शकतात. कारण प्रत्येक धर्माने चांगल्या मूल्यांनाच आदर्श मानलं आहे किंवा चांगली मूल्यं हीच प्रत्येक धर्माचे आदर्श आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांध्ये परिस्थितिजन्य बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते. पूर्वी जीवो जीवस्य जीवनम् असे होते परंतु भगवान महावीर यांनी जगा आणि जगवा हा महान मंत्र जगाला दिला आहे. त्याचे प्रत्येक व्यक्तीने आचरण केले पाहिजे.

परीक्षेत मिळविलेल्या गुणांना फार महत्त्व दिले जाते. परंतु गुणवत्ता म्हणजे ज्ञान नाही व पदवी म्हणजे विचार नाही. विद्यार्थ्यांध्ये समाज माझा आहे अशी भूमिका निर्माण झाली पाहिजे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन व चारित्र्यनिर्मिती करण्याची शिक्षणपद्धती विकसित झाली पाहिजे. उच्चशिक्षण घेतल्यामुळे आर्थिकदृष्ट्या भक्कम होता येते. शिक्षण आत्मसात करता येते. परंतु निर्णय क्षमता ही आई-वडिलांनी केलेल्या संस्कारातून विकसित करता येते. याचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ॥शिक्षण॥ समाजाविषयी द्रष्टेपणा हवा, तो विचारातून, आचरणातून दिसून येतो. महात्मा फुले हे विचारवंतांचे विचारवंत होते. महिला शिक्षणाचा पाया रचणारे फुले यांच्याविषयी उच्चभ्रू वर्गातील किती महिलांना जास्त माहिती आहे हा एका प्रश्न व खंत आहे. महात्मा फुले यांनी त्यांच्या काळात पाण्याचा हौद उपलब्ध करून दिला हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत जाती व्यवस्था कुमकुवत होण्याऐवजी ती भक्कम झाली असून प्रबळ जातीकडेच आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्रित झालेली दिसून येत आहे.

आई-वडील, जात-धर्म आपण निवडू शकत नाही, पण चांगले मित्र आपण निवडू शकतो. त्यावरच आपले भवितव्य अवलंबून असते. फेसबुक, इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल यांच्या आहारी सध्याची पिढी एवढी गेली आहे की समाजाचं माणूसपण हरवत चाललंय. घरातील नाती दुरावत असून समर्पणाची भावनाही कमी होत आहे. बाराव्या आणि तेराव्या शतकात संतांनी महाराष्ट्रामध्ये विेशसंस्कृतीचा पाया घातला. रूढी, परंपरा या विरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी केले. संतांनी त्यासाठी केलेला संघर्ष अतिशय गुंतागुंतीचा आणि तितकाच प्रखर होता. संतसाहित्य म्हणजे अनमोल ठेवा असून त्यातील विचार आचरणात आणण्याची गरज आहे. देशातील विविध धर्म, जाती भाषा हे आपल्या देशाचे बलस्थान आहे.

स्वत:बरोबर इतरांच्या जात, धर्म, भाषेचा आदर करण्याचे तत्त्वज्ञान संतांनी मांडले. सांस्कृतिक संघर्षाचे आव्हान पेलणारे साहित्य संतांनी निर्माण केले. त्यामुळे संतसाहित्याच्या आधारे जगाला मार्गदर्शन करण्याची ताकद आपल्या विद्यार्थ्यांध्ये निर्माण होऊन समर्पणभावनाही तयार होईल व जगाचा गुरू होण्याची संधी भारताला मिळेल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 212

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds