";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ही मुंबई, अशी मुंबई

ही मुंबई, अशी मुंबई

E-mail Print PDF

Add this to your website

 

मूळ मुंबईकर या नात्याने, परवाच्या एलफिन्स्टन, परळ रेल्वे संयुक्त पुलावरी  चेंगराचेंगरीत तेवीस व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. याचे मला दु:ख आहेच. ही घटना दुर्दैवी, दु:खद होय. सर्वपक्षीय पुढारी आता जागे होऊन रेल्वेला दूषण देत आहेत, परंतु यापूर्वी एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बदलण्यात यांना स्वारस्य होते. आता सदर दुर्घटनेच्या सायंकाळी/ रात्री राजकीय पुढारी काय करीत होते हे बाहेर आले आहे, त्याप्रमाणे रेल्वेविषयी सतत तक्रारी मांडणारे खासदार किरीट सोय्या भांडुप येथे गरबा, दांडिया खेळण्यात मग्न होते तर महापौर बंगल्यावर परदेशी फुटबॉलपटूंना मेजवानी देण्यात आली. या संदर्भात छशीे ुरी षळववश्रळपस, ुहशप ठेाश ुरी र्लीीपळपस हे आठवले. असो. मुळात अशा दुर्घटना का घडतात याची  कारणमीमांसा केल्यास अनेक गोष्टी दृष्टीपथात येतात.

त्यादिवशी पाऊस पडत असल्याने लोक एकाच जागेवर गर्दी करून पाऊस थांबण्याची वाट बघत होते. लोक जिन्यावरून खाली उतरत गेले असते तर गर्दी कमी झाली असती. त्यातच पुल कोसळल्याची अफवा पसरली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यात पुलही अरुंद आणि तोही फेरीवाल्यांनी व्यापलेला. (सौजन्य रेल्वे पोलीस) ही सर्व तात्कालिक कारणे झाली, परंतु या बाबतीत साक्षेपाने, साकल्याने विचार केल्यास पुढील गंभीर बाबी लक्षात येतात- मुंबईची लोकसंख्या चारी अंगांनी अफाट वाढलेली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, बंगाल व इतर परराज्यातून माणसांचा प्रचंड लोंढा मुंबईकडे कूच करीत आहे. उदरनिर्वाहासाठी कोकणातीलही चाकरमानी मंडळी मुंबईत येत आहेत.

त्यामुळेच जुळी मुंबई जन्माला आली व आता तर तिळ्याचा जन्म अपरिहार्य दिसतो. अर्थात मुंबईत आल्यावर प्रत्येकाची काहीना काही पोटापाण्याची सोय होते, तो उपाशी मरत नाही. पण त्यामुळे मुंबईला बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे, ती कॉस्मो पॉलिटिन म्हणून गणली जाऊ लागली. या सर्वांना पाणी, वीज, आरोग्य, रस्ते इत्यादी सेवा पुरवितांना सरकारी, निमसरकारी संस्था मेटाकुटीस येऊन त्यांच्यावरील ताण वाढला. दर अडीच मिनिटाला एक उपनगरी रेल्वे गाडी सोडूनही गाड्यातली गर्दी काही कमी झाली नाही. रोज तिन्ही रेल्वेतून दहा ते बाराजण पडून मृत्यूुखी पडतात. रेल्वेच्या पेंटोग्राफला लटकून स्टंटबाजी करणारे वेगळेच. मध्यंतरी इमारती कोसळून दुर्घटना घडू लागल्यावर स्ट्रक्चरल ऑडिटची कल्पना पुढे आली. अनेक ठिकाणचे कमकुवत पुल कोसळल्यावर सर्वच पुलांची पाहणी केली गेली.

आताही वरील दुर्घटनेने जागे होऊन रेल्वे सर्वच पुलांची पाहणी करून शक्य असेल तिथे त्यांची रुंदी वाढवून तर काही ठिकाणी पर्यायी पुल बांधण्याचा विचार करीत आहे. याबरोबर सर्वच कार्यालये जी दादर (मध्य व पश्चिम रेल्वे) च्या पुढे एकवटलेली आहेत, त्यांचे विकेंद्रीकरण करून काही कार्यालये उपनगरात हलविणे गरजेचे आहे. जाणार्‍यांसाठी एक पुल, येणार्‍यांसाठी दुसरा पुल अशी सोय असल्यास समोरासमोर गर्दी येत नाही. पुणे रेल्वे स्टेशनबाबत गर्दीचा हीच अवस्था आहे. उपनगरी विभाग वेगळा नसल्याने थेट लांब पल्ल्याच्या गाड्या व उपनगरी गाड्या आल्यावर स्थानकावर तसेच पुलावर एकच गर्दी उसळते. त्यात रेल्वेने आयत्या वेळेस गाडी येण्याचे फलाट बदलल्याची उद्घोषणा केल्यास प्रवाशांची एकच धावपळ होऊन चेंगराचेंगरी होते. मुळात जिथे लाखो लोक एकावेळी एकत्र येतात तिथे स्वयंशिस्त महत्त्वाची असते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 152

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds