";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अडगळीतले शब्द

अडगळीतले शब्द

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आन - शपथ आहे म्हणण्याऐवजी माझी आन आहे म्हणत. कांडर - ऊसाचं जे छोटं पेर असतं त्याला कांडर म्हणतात. कोट, घरटी - पक्षी उन्हापावसापासून संरक्षण व्हावे किंवा होणार्‍या पिलांचं रक्षण व्हावे यासाठी अतिशय सुरक्षित घर गवतापासून किंवा काटक्यापासून तयार करतात त्याला कोट किंवा घरटं म्हणतात ते अतिशय अडचणीच्या ठिकाणी बनवलं जातं. खळगा - म्हणजे खड्डा किंवा स्त्रियांची ती एक शिवी आहे, ‘तुझा खळगा भरला.रांड - जिचा पती मेला आहे तिला रांड म्हणतात. रांडंच्या - ही पुरुषांची शिवी आहे. का त्या रांडंच्या नादाला लागलायस?

बीळ - सरपटणार्‍या प्राण्याचे किंवा उंदीर, घूस यांनी जमीन उकरून बीळ तयार केले जाते, ते त्यांचे घर असते त्याला बीळ म्हणतात. इटाळशी - स्त्रियांचा एम.सी. काळ, या काळात चार दिवस जी स्त्री इटाळशी असेल तिनं कोणाला शिवायचं नाही किंवा तिला कोणी शिवायचं नाही. जेवणासाठी ताट, वाटी, पितळी वेगळी. त्यातच वरून जेवण वाढायचं. ती भांडी तिची तिनंच धुवायची, त्या भांड्यालाही कोणी स्पर्श करायचा नाही,

त्याला बाहेर बसणे किंवा इटाळशी म्हणत. कर्कशा - घरात सतत वादावादी भांडण होणं, शांतता नसणे, त्याला घरात फारच कर्कशा झालाय म्हणतात. संग - बरोबर राहणे, संगतीत राहणे, बरोबर चालणे, माझ्यासंग राहा, चुकशील या अर्थाने. चिनपाट - ग्रामीण भागात पूर्वी संडासला शेतात किंवा ओढ्याला जावे लागायचे त्याच वेळी संडासला जाताना पाणी नेण्यासाठी एक पत्र्याचा डबा आणि त्याला वर गोलाकार तार धरण्यासाठी बांधलेली असायची, त्या डब्याला चिनपाट म्हणयचे. वागर - धनगरांची मेंढरं पावसाळा संपला की शेतात बसवतात.

त्यामुळे शेतीला खत मिळते. त्या मोबदल्यात शेतकर्‍याकडून धनगरांना धान्य मिळते. दिवसभर मोकळ्या शेतात मेंढरं चारायची आणि संध्याकाळी ठरलेल्या शेतकर्‍याच्या शेतात आणून बसवायची. मेंढरं रात्री कुठं जाऊ नयेत म्हणून त्यांच्या चारी बाजूंनी दोरीनी बनवलेली जाळी बांधतात. त्यामुळे मेंढरं जाळीच्या बाहेर जात नाहीत त्याला वागर म्हणतात. डालपाटी - मेंढारांची लहान-लहान पिल्लं असतात ती पिल्लं मेंढरांबरोबर चरायला जात नाहीत, ती जिथं मेंढरं बसलेली असतात तिथंच ठेवली जातात. ती इकडे- तिकडे जाऊ नये म्हणून झाकून ठेवतात, ज्यामध्ये झाकून ठेवली जातात त्याला डालपेटी म्हणतात. तळ - मेंढरं शेतात ज्या ठिकाणी बसतात, त्याला तळ म्हणतात. कोकरू - मेंढराच्या लहान पिल्लाला कोकरू म्हणतात  वाझूंट - ज्या स्त्रिला किंवा पुरुषाला मूलबाळ होत नाही

त्याला वाझूंट म्हणतात. सनवार - शनिवार, आइतवार - रविवार, बीस्तरवार - गुरुवार, जल्म - जन्म, भाकनूक - भविष्य, श्यात - शेत, राबन – कष्ट करणे, कण्या - ज्वारीचं पीठ, इडा - विडा, जिना - जिवंत, डोस्क - डोक, सांज - रात्र, साज - आजार, वझ - ओझं, आवशिद - औषध, इस्तू - विस्तव, इळभर - दिवसभर, चान्नी - चांदणी, लगीच - लवकर, पावना - पाहुणा, भनी - बहिणी, कळ्ळा - कळला, वकारी - ओकारी, इच्चू - विंचू, म्या- मी, हुतो - होतो. शिव्या - रांड, रांडच्या, कडूबेन, मुडद्या, उंडगीच्या, सुक्काळीच्या इत्यादी.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 47

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds