";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- एक निराळी संक्रात - प्रकाश राजे

एक निराळी संक्रात - प्रकाश राजे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

सन 2018 ला निरोप देऊन आपण 2019 चे जोरदार स्वागत केले आहे. या नव्या वर्षातील पहिला स म्हणजे संक्रांत! सर्वांना तिळगुळ देऊन वर्षभर गोड बोलण्याचे वचन घेणार आणि देणार, तर स्त्रिया रथसप्तमीपर्यं संक्रांत हळदीकुंकू समारंभ साजरा करण्याच्या गडबडीत असतील. संक्रांत हळदीकुंकूवाचे वेळी ओसा वस्तू काय द्यायची हा त्यांना एक मोठा प्रश्न असतो. कोणी गुळ, साखर, डाळ किंवा असाच एखादा पदार्थ देतात.

कोणी स्टीलची वाटी, ताटली, चमचा वगैरे देतात तर कोणी प्लॅस्टिकच्या वस्तूपैकी काही देतात. विचार केला तर येणार्‍या स्त्रियांपैकी कोणाच्याच संसाराला या गुळ, साखर, वाटी, ताटली किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंची गरज नसते. परंतु आपली एक प्रथा म्हणून प्रत्येक घरात यावर दोनचारशे रुपये खर्च केले जातात. तर तळेगावमध्ये असे एक मोठे मुलांनी भरलेले घर आहे की त्यांना रोज डाळ 3 किलो, तांदूळ 5 किलो, कडधान्य दीड किलो, गहू किंवा ज्वारी 8 किलो, साखर 1 किलो लागत असते. या घरात 50 मुले-मुली आहेत.

सर्व शिकणारी, पहिली ते बारावीपर्यंतची. शिक्षणासाठी वह्या पुस्तके आणि इतर खर्च आहेत . थंडीचे दिवस आले की स्वेटर, पांघरूण लागते. परीक्षेचे दिवस आले की गाईड- पुस्तके लागतातच आणि या एवढ्या मोठ्या घरात कमावते कोणीच नाही. या सर्व मुलांची काळजी घेतात.

संजिवनीताई मराठे आणि त्यांच्याबरोबर रविंद्र व शितल कमाने. हे घर तळेगावमधील बहुतेकांना माहीत असेलच, ते आहे कै. दादासाहेब चाफेकरांनी स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळचा उद्योगधाममधील अनिकेत आश्रम, या सर्व 50 मुला-मुलींच्या शिक्षण, जेवण, राहण्याची व्यवस्था होते आश्रमाला मिळणार्‍या छोट्या-मोठ्या देणग्या, धान्य, वह्या, पुस्तके आणि गरजेनुसार मिळालेल्या भेटी यातूनच. आश्रमाला दिली जाणारी रक्कम करमुक्त आहेच, पण वस्तूरूपी भेटीचीही आपल्याला पावती मिळते. त्यांच्या कार्याची अधिक माहिती घेण्यासाठी सेक्रेटरी श्री. मंदार देशपांडे (मोबाइल क्र. : 9850056534) किंवा रेक्टर श्रीमती संजिवनीताई मराठे (मोबाइल क्र. : 8805756474) यांच्याशी आपण संपर्क करू शकता. असे म्हणतात की एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तर दर संक्रातीला आपल्या सात तीळातील एक तीळ या 50 मुला-मुलींना दिला व संक्राती निमित्ताने भेटणार्‍या सर्वांना अनिकेत आश्रमाची माहिती करून दिलीत तर आपली संक्रांत नेहमीपेक्षा निराळी होईल. *

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 72

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds