";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

बांधिलकी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

बांधिलकी अनेक प्रकारची असते, जी आजकाल दिसून येत नाही. स्वत:पुरतं पाहणारे जिकडे-तिकडे दिसून येत आहेत. कुणाला कुणाविषयी आपुलेपण किंवा भान जे नात्यांचे, वागण्याचे वा कर्तव्याचे राहिलेले नाही त्यामुळे बांधिलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आज समाज विसकळीत आणि खिळखिळीत झाला आहे. माणुसकी राहिली नसल्यामुळे दुरावा वाढत चालला आहे. प्रत्येक जण माझा स्वार्थ कशात आहे हेच पाहत असतो. या स्वार्थाच्या डबक्यात अडकल्यामुळे त्यागाचा प्रवाहपण नष्ट झाला आहे.

सगळ्या समाजात एक तुंबलेपण निर्माण झाले आहे. उंबरातले किडेकोडे उंबरी करिती लीलाअसे अनाचाराचे वर्णन खरंतर करावेसे वा ते. नात्यांची चाड राहिलेली नाही त्यामुळे घरात डोळ्यांसमोर मोठी होणारी मुलगी आज बापाच्या वासनेची बळी ठरत आहे आणि ही संख्या रोज वाढतच आहे. या समाजावर, या मनावर वासनांची बांधिलकी धुंद लहर घोंघावत आहे. समाज पेंगुळला आहे. जनमानसाला एक वेगळी सुस्ती आलेली आहे. एक प्रकारची ग्लानी आलेली आहे. सर्व सुखसोई हातात असताना सुख, समाधान मन:शांती राहिलेली नाही, पूर्वी यज्ञ याग करताना सर्व वातावरणशुद्धी तर होतच असे पण त्याचबरोबर समृद्धी, ऐहिक, आर्थिक पारमार्थिक प्रगती होत असे, पण आज पाहिले तर सगळीकडे हव्यास. यज्ञात हे वासनांध मुनी, साधक हे संपत्तीचे व वासनेचे पुजारी अनेक जीवांचे बळी देत आहेत. अवनीच्या (नरभक्षक वाघीण) हत्येवर राजकारण रंगवले जाते,

पण या अवनीवरील कित्येक कळ्या या हव्यासाच्या शिकार झाल्या पण त्यांच्याविषयी इतक्या पोटतिडीकीने बोलताना दिसत नाहीत. आई-वडील आजकाल मुलांशी, मुले आई-वडिलांशी, भाऊ-बहीण एकमेकांशी, शिक्षक विद्यार्थीवर्गाशी, व्यापारी ग्राहकाशी, डॉक्टर रोग्याशी, वाहक-चालक प्रवाशांशी, बॉस आपल्या ऑफिसमधील सहकार्‍यांशी, शेजारी शेजार्‍यांशी आज विशिष्ट बांधिलकीने वागताना दिसत नाहीत. आपुलकीची साखळी आज तुटलेली आहे. हृदयाला हृदयाने जोडणारे दुवे निखळले आहेत. अहो! इतकेच काय भक्ताच्या टक्केवारीच्या व्यवहारात देवांनाही कुणी सोडलेले नाही. त्यामुळे देवही भक्तांच्य हृदयात नाही तर तिजोरीत बंद होतो आहे. दिलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना निरखण्यात जिकडे-तिकडे देव दंग आहे.

त्यामुळे पीडित व रंजल्या गांजल्या दुरिताल आधार द्यायला संताकडे वेळ नाही. पापाच्या देणग्या स्वीकारून देव आणि संत त्या ओझ्याखाली वाकले आहेत तर निष्पा जीवांना रक्षण देणारा वाली आज राहिलेला नाही. नामदेवाच्या घासाचा भुकेला दे दामदासाचा दास झाला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. सुंदोपसुंदी कारभार मान्यताप्राप्त होत आहे. नीतिमानतेने वागणार्‍यांना वाळीत टाकले जात आहे. निषिद्ध मानले जात आहे. बांधिलकीची दुसरी बाजू अशी पण आहे की कुणाला मदत करावी तर करणार्‍याला आवडते की नाही किंवा करून काही व्याप वाढतो. त्यात वेळ जाईल, बदनामी होईल या भीतीने कुणी कुणाला मदत करायला धजावत नाही. पण योग्य मार्गाने जर आपण जबाबदारीची जाणीव ठेवून समाजकार्यात उतरलो तर आपण सर्व प्रकारची बांधिलकी जणू शकतो. दुर्बल घटकांना त्यांचे हक्क मिळवून देऊ शकतो.

आजकाल दुसर्‍यांचे दु:ख ऐकून घ्यायलाही कुणाला वेळ नाही, पण एखाद्याची उणी बाजू समजली तर ती वाढवून चढून सर्व दूर कशी पसरेल यासाठी वेळ देऊन प्रयत्न करणारे महाभाग काही कमी नाहीत.आजकाल अनेक माध्यमांद्वारे नको त शिक्षण सगळ्यांना मिळत आहे. त्यामुळ सर्व थरातील लोक त्याचे बळी होत आहेत म्हणून उघड उघड अत्याचार आज वाढलेले हेत. स्त्रियांना नोकरी करावी लागते,

पण त्यामुळे सांसारिक स्थिरता राहिलेली नाही. आर्थि म्हणाल तर गरजाच इतक्या वाढल्या आहेत त्यामुळे कितीही कमावले तरी स्थैर्य प्राप् होत नाही आणि मानसिक स्वास्थ्यही नाही. शारीरिक त्रास वाढतात ते वेगळेच! शिवाय मनं दुभंगणे, संसार दुभंगणे, एकमेकांविषय विेशास न वाटणे या गोष्टी बांधिलकीस बाधकच होत आहेत. लग्न-संसार म्हणजे एक मूल, घरात भरगच्च महागडे फर्निचर, 4/ 5 बेडरूमचे फ्लॅट, गरगरीत शरीर, गलेलठ्ठ पगार, स्वीस बँकेत खाते असावे हे स्वप्न असेच समीकरण झालेले आहे, पण हे सगळ असमाधानाच्या खोल गर्तेत नेणारे आहे. हे दृष्टीपथात यावे म्हणून माझ्या मनाला वाटणार्‍या सामाजिक बांधिलकीतून मी हे लिहित आहे एवढेच! दुखरा, तळमळणारा हा समाज पाहवेना डोळा । वाटतो उमाळा दुरितांचा

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 64

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds