";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

उंबरठा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

हिंदू परंपरेध्ये उंबरठ्याला मर्यादेचे प्रतिक मानले आहे. उंबरठा म्हणजे एक सीमारेषा. प्रत्येक शुभकार्यात उंबरठ्याचे पूजन केले जाते. तसेच नववधू तिचे पहिले पाऊल उंब ठ्याच्या साक्षीने टाकते. उंबरठ्यावरचे धान्याचे माप ओलांडूनच ती आत प्रवेश करते. इतका उंबरठ्याचा आदर होता आणि आहेच, वास्तू कितीही सुशोभित नव्याने सजलेली असली तरी त्या वास्तूला उंबरठ्याशिवाय शोभा नाही.

आज वाडा संस्कृती लोप पावली असून फ्लॅट संस्कृती अस्तित्वात आली असली तरी मांगल्याचे प्रतिक म्हणून छोटी उंबरापट्टी बसवण्यात येते, इत्यादी विविध पद्धतीने उंबरठ्याचे महत्त्व सांगता येते. उंबरठा म्हटल्यावर आपल्या सगळ्यांनाच घराच्या उंबरठ्याचीउंबरठा आठवण होणे साहजिक आहे. पण इथे आपल्या सगळ्यांनाच माझ्याm अनुभवांचा उंबरठा कसा ओलांडला हे मी सांगू इच्छिते. शाळा आणि महाविद्यालयांध्ये असतानाच मला छोट्या-मोठ्या लेखनाची आवड होती आणि त्याच काळामध्ये मी काव्यलेखन, निबंध आणि लेख असे काही लेखन केले होते, पण ती माझी आवड किंवा छंद त्या काळापुरतीच मर्यादित राहिली कारण पदवीधर झाल्यानंतर लगेचच माझा विवाह एका सुसंस्कृत घराण्यात झाला. संसाराचा गाडा चालू झाला

आणि बघता-बघता अनेक सुखदु: खांच्या वाटेवरून जात असताना दोन मुलांचे उच्चपदवीचे शिक्षण पूर्ण होत असतानाच अचानकच एकदा माझ्या वाचनात माझिया माहेरासदर साठी लेख मागविण्यात आले होते, त्याच वेळी मला माझ्या लेखनाची स्फूर्ती झाली आणि मी लगेचच एक लेख लिहून पाठवला आणि विशेष म्हणजे पहिल्याच सदरामध्ये तो प्रसिद्धही झाला. त्या अनुभवाने जवळचे मित्र-मंडळी आणि नातेवाईक यांच्या कौतुकाने मी भारावून गेले, त्याच वेळी मी माझ्या मनाशी ठरवले, पुन्हा नव्याने लेखनाची आवड जोपासावी आणि माझ्या लेखनातून समाजप्रबोधन करावे. त्याची दखल म्हणून मी पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात केली

आणि त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेतले. मी गृहिणी असल्याने तसा माझ्याकडे पुरेसा वेळही होता आणि म्हणूनच मी माझा बराचसा वेळ वाचनासाठी देऊ लागले, जवळच्याच ग्रंथालयामध्ये जाऊन काही कथा, कादंबर्‍याही वाचू लागले आणि त्यातूनच मला काही नवीन लेखन लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यात भूतकाळातील काही आठवणींवर किंवा वर्तानातील घडामोडींवर लेखन केले आणि त्याचीच काही स्थानिक वृत्तपत्रांनी दखल घेऊन काही लेख प्रसिद्ध केले. या सगळ्याचा मला खूपच आनंद झाला आणि मी माझे लेख

असेच पुढे चालू ठेवले आहे. यातून मला खूपच आत्मिक समाधान तर मिळते पण त्याचसोबत आज माझी जवळच्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांध्ये फक्त एक गृहिणी म्हणून नाही तर एक नवोदित लेखिका म्हणून ओळख झाली. जसा मी विवाहाच्या वेळी माहेरावरून सासरी येताना उंबरठा ओलांडला होता, तसाच उंबरठा माझी लेखनाची आवड जोपासण्यासाठी दुसर्‍यांदा ओलांडला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. मला माझ्या भगिनींना एक सांगणे आहे की, आपणही आपल्या सुप्त गुणांना ओळखून, आपल्या जबाबदार्‍या, मर्यादा सांभाळून स्वत:चा शोध घेत आपल्या आवड आणि छंदासाठी नव्याने पुन्हा एकदा उंबरठा ओलांडून नव्या स्वप्नाची भरारी घ्यावी.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds