";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आडनावांची आडवळणे!

आडनावांची आडवळणे!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

नावाप्रमाणे आडनाव आपल्या आईवडिलांकडून मिळत असते. ज्यांचे आईवडील शहाणे असतात त्यांच्या मुलांचं ठीक असतं. परंतु ज्यांचे आईवडील यथातथाच असतात त्यांची मात्र पंचाईत होते. रडे, येडे, डोईफोडे, मानकापे, चाटे असली नावं-आडनावं वाट्याला आली तर काय करावं मुलांनी? त्यांना विनाकारण टोणे ऐकावे लागतात, मानहानी पत्कारावी लागते. कुणाची मान कापली, कुणाचं डोकं फोडलं, काय चाटे असल्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी लहान मुलांनी? मुलं हिरमुसली होऊन आपली व्यथा आईपुढे मांडतात.

आई तरी कशी समजूत काढणार? ‘जाऊ दे, लक्ष नको देऊसया पलीकडे दुसरं काय सांगणार आई तरी! पण अशा गोष्टी लहान मुलांना डाचत असतात. मुलं दांडगट असली तर त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. परंतु गरीब दुबळ्या मुलांना मात्र उपहास, टोणे सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि आजकाल नवीनच टूम निघालीय; जोड आडनावं लावण्याची. वास्तविक जोड आडनाव लावण्यात गैर काही नाही. आपले आडनाव काय असावे हे ठरवण्याचा त्या कुटुंबाला पूर्ण हक्क आहे. परंतु नवीन जोड आडनावामुळे मुलांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू नये एवढा विचार त्या जोडप्याने जरूर करावा. उदा. काळे- गोरे, खोटे-नाटे, वाघ-लांडगे अशा आडनावांनी खसखस पिकू शकते. शिवाय  अशा विचित्र आडनावाुंळे मुलांना काय काय ऐकावं लागेल हे पण जोडप्याने ध्यानात घेणं गरजेचं आहे.

, डबल बॅरल गन” “, एक तर फडतरे तरी म्हणायला सांग किंवा नितसुरे तरी म्हणायला सांग. फडतरे- नितसुरे असं डबल डबल आडनावं नाही म्हणणार.” “, चित्रे-शिंत्रे काय? विचित्र कुठला!अशी शेरेबाजी लहान मुलांच्या वाट्याला आली तर मुलं किती दुखावली जातात याची कल्पना मोठी माणसं करू शकतात. माझी विवंचना मात्र वेगळीच आहे. समजा एखाद्या गजेंद्रगडकर कुलोत्पन्न वराचं एखाद्या अफजलपूरकर कुलोत्पन्न कन्येशी (अर्थातच अस्मितावान) जमलं तर नवीन आडनाव गजेंद्रगडकर-अफजलपूरकर असं होईल आणि अशा जोडप्याच्या मुलांना वात्रट मुलं नक्कीच चिडवणार की. अरे, हे तुझं आडनाव आहे की मालगाडी? आपले सर यापुढे कुणाला शिक्षा करायची झाल्यास तुझं आडनाव दहा वेळा म्हणायला सांगतील बघ.अशी वेळ लहान मुलांवर कधीच यायला नको असं वाटत असेल तर कृपया वृथा अस्मिता टाळा व सासरचं किंवा माहेरचं एकच आडनाव लावा.

मधुकर पानट

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 77

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds