";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मराठी साहित्यातील पहिले संशोधक टीकाकार - संत एकनाथ

मराठी साहित्यातील पहिले संशोधक टीकाकार - संत एकनाथ

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

महाराष्ट्राच्या संतमालिकेतील आदर्श गृहस्थाश्रमी संतम्हणून एकनाथ महाराज यांना उच्चस्थान आहे. एकनाथ षष्ठी हा त्यांचा महानिर्वाणाचा दिवस! शांतिब्रह्म संत एकनाथाुंळे पैठण क्षेत्र झाले. ज्ञानोबाुंळे आळंदीला महत्त्व आले, देहू गावास तुकोबारायाुंळे महत्त्व आले, तसे संत एकनाथाुंळे पैठणला! गृहस्थाश्रमात राहून त्यांनी परमार्थ साधला. धर्मपत्नी, मातोश्री, सुपुत्र (हरिपंडित) श्रीखंड्या व उद्धव, आजोबा, आजी यांच्यासह त्यांनी आपला संसारही धन्य करून दाखविला. सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्यांना दत्तदर्शन करून दिले. तसेच चार वेदांचे, सहा शास्त्रांचे, अठरा पुराणांचे, उपनिषदाचे, रामायण-महाभारत व भगवत्गीतेचे सारगर्भ ज्ञान दिले.

संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, हस्तमालिक, आनंद लहरी, हरिपाठ, अभंगगाथा, चिरंजीवपद, अध्यात्म रामायण आदी ग्रंथांची प्रासादिक भाषेत रचना केली. पैठण येथे प्रवचन, निरूपण, कीर्तन, नामसंकीर्तन आदी माध्यमातून समाजप्रबोधन केले. प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचा मार्ग सामान्यजनांना दाखविला. जीवघेण्या रूढी, धार्मिक अराजक, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्याविरोधी त्यांनी वैचारिक आसूड ओढले. आधी केले मग सांगितले किंवा बोले तैसा चालेयाप्रमाणे वागून समाजाला दिशा देण्याचे काम केले. नामविण मुख, सर्पाचे ते बीळ ।किंवा भक्तीवीण पशू कशासी जन्माला ।

सटवीने नाही नेला कैसा ।’ ‘काय माय त्याला व्याली गेली होती भुतापाशी ।अशा कडक शब्दांत कोणतेही कर्मकांड, जपजाप्य न करता नामस्मरण भक्तीचे महत्त्व त्यांनी विशद केले. सुख, समाधान मिळवायचे असेल तर नेहमी शांत व आनंदी रहा अशी त्यांची साधी सोपी शिकवण होती. विवेक व वैराग्य तसेच ज्ञान व भक्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या जीवनात झाला होता. सर्व जनांध्ये जनार्दन पाहणार्‍या या महान संताने आपले आयुष्य दु:खी पतितांसाठी वाहिले. दृष्टीत समता अंत:करणात ममता आणि सर्व जीवांविषयी समानताहा त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र होता. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा समाजात पराकोटीचा कर्मठपणा होता त्या वेळी एकनाथांनी अस्पृश्याचे चुकलेले पोर उचलून घेतले. काशीहून रामेेशरासाठी

कष्टपूर्वक आणलेली कावड तहानेने कासावीस झालेल्या गाढवाला पाजून रिकामी केली. प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेेशर पाहिला, श्राद्धासाठी केलेले जेवण दीनदलितांना वाटून टाकले. माणसामाणसांध्ये भेदभाव मानणे योग्य नाही हे आचरणाने दाखवून दिले. चिखलात रुतलेल्या डुकराच्या पिलाला त्यांनी मायेने उचलून घेतले. आपल्या उपरण्याने त्याचे अंग पुसले. प्राणिमात्रांवर दया करणारे नाथएकशे आठवेळा अंगावर थुंकणार्‍या नाठाळावर रागावले नाहीत. त्यांनी गोदावरीत जाऊन तितक्या वेळा अंघोळ केली. पुण्यसंचयापेक्षा दृष्टांचे हृदय परिवर्तन हे खरे धर्मपालन आहे असे त्यांनी दाखवून दिले. राज्यरक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन, प्रत्यक्ष युद्ध करणारा हा संत होता. रणांगणसुद्धा धर्मक्षेत्राइतकेच महत्त्वाचे असते याचा पाठ घालून दिला. संस्कृत भाषेशिवाय वेदार्थ सांगणे हा मोठा अपराध मानला जाई अशा काळात त्यांनी प्राकृत भागवताची रचना केली. प्रस्थापित सनातन्यांच्या विरोधाला तोंड दिले. मात्र शेवटी त्याच नाथभागवतया प्राकृत ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानेेशरी शुद्ध करून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली. मराठी साहित्यातील पहिले संशोधक टीकाकार म्हणून त्यांचा गौरव होतो. सामाजिक समतेच्या या प्रणेत्यास कोटी कोटी प्रणाम!

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 23

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds