";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- प्रचारातून देशहिताच्या गोष्टी मांडा, वैयक्तिक द्वेष दाखवू नका

प्रचारातून देशहिताच्या गोष्टी मांडा, वैयक्तिक द्वेष दाखवू नका

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

रंगपंचमीच्या रंगात निवडणुकीचा प्रचार हा वैयक्तिक द्वेषाचे रंग उधळत चालला आहे आणि यातून मतदार पूर्ण वगळला आहे. माझ्या पक्षाला भरघोस मतांनी विजयी करा, मी तुची, देशाची अमुक-अमुक कामे करीन असे कोणीच म्हणत नाही, फक्त समोरच्याचे वैयक्तिक दोष, जाहीरपणे निवडणुकांच्या स्टेजवर काढले जात आहेत. निवडणुकांच्या प्रचारसभा आता मनोरंजनाचे, करमणूक करणारे स्टेज बनले आहे. अनेक नेते एकमेकांच्या नकला करत आहेत. समोरच्याच्या शारीरिक हालचाली,

आवाज जसेच्या तसे करून दाखवतो आहे. आपण चांगले अभिनेते आहोत हे सिद्ध करून दाखवत आहेत. कारण बोलायला मुद्देच नाहीत. ही विनोदी व्याख्याने ऐकायला गर्दी होते आहे. टी.व्ही.च्या मार्‍याने वैतागलेली जनता घटकाभर करमणूक म्हणून या सभांना जात आहे. एकाच घरातले आणखी कोणकोण उरले सुरले बोर्डावर येणार आहेत, हे ऐकण्याची संधी लोक सोडत नाहीत आणि घोषित सर्वच पक्षांचे उमेदवार इकडूनतिकडून एकमेकांचे नातलग आहेत. ज्यांना एक मिनिट बोलायचं धाडस नाही, काय बोलायचं कळत निवडणुकीचा प्रचार वैयक्तिक द्वेषाभोवती नाही,

कारण अभ्यासच नाही. फुग्यात हवा भरली की तो जसा वर जातो, तसं यांना उचकून देत, मग हे खासदारकीच्या स्वप्नांनी लागले नाचायला. भारताचं हे आणखी एक दुर्दैव. लोकसभा निवडणुकीचं इतकं हसू यापूर्वी झालं नाही. उभ्या राहिलेल्या किती उमेदवारांना भारताच्या, राज्याच्या नेक्या समस्या काय आहेत, काही माहिती आहे का? यातल्या कोणी संपूर्ण राज्याचा, नवीन शिक्षणपद्धतीचा, आंतरराष्ट्रीय संबंधाचा, देशाच्या सीमांचा, एखाद्या जातीचा, एखाद्या पिकाचा, कारखानदारीचा, आरोग्य समस्यांचा, हवामानशास्त्राचा

अभ्यास केला आहे का? सांगा ना! कशाच्या जीवावर खासदार करायचं? केवळ या पक्षातून त्या पक्षात गेला म्हणून? पक्षबदल म्हणजे उभं राहण्याची लायकी का? की वंशपरंपरागत घराण्यात राजकारण आहे, म्हणून ती लायकी? मतदाराने काय समजायचं? कोणत्याच पक्षात तसा ताळतंत्र राहिला नाही. काय बोलायचं, कोणी कोणाला बोलायचं, याचं भान नाही. आता दुसरा मुद्दा - सध्या केवळ चांगलं काम करणार्‍या पंतप्रधानांना आणि त्यांच्या टीमला घरी बसवायचं हा वैयक्तिक द्वेष उफाळून आला आहे, सबब वरील चित्र दिसते आहे,

पण हे देशहिताचं नाही. स्वच्छता, रेल्वे, रस्ते, अतिरेक्यांचा खात्मा, आंतरराष्ट्रीय पाठिंबा या गोष्टी विरोधीपक्षांच्या मंडळींना दिसत नाहीत का? वाट्टेल ते पुरावे पंतप्रधानांना मागताना अनेक वर्ष राजकारणात घालवलेली माणसं, उचलली जीभ लावली टाळ्याला असं वागत आहेत, त्याचं कारण खुर्ची नसणं आणि वैयक्तिक द्वेष असणं हेच आहे. तेव्हा प्रचारातून देशहिताच्या गोष्टी मांडा, वैयक्तिक द्वेष दाखवू नका.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 19

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds