";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- रामराज्य येवो ही जनतेची इच्छा!

रामराज्य येवो ही जनतेची इच्छा!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

निवडणुकीचे वारे वाहतात आणि कोणता पक्ष, कोणता उमेदवार निवडून येणार कोण-कोणाची वर्णी लागते याची चर्चा, खल कोपर्‍या-कोपर्‍यावर, गल्ली-गल्लीत रंगते. आपल्या वॉर्डधला उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत गेला तर आपल्या समस्या, आपले प्रश्न सुटतील का? हासुद्धा त्या वादातील,चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. मानवी जीवनाच्या विचारांचे, भाव- भावनांचे, वृत्तीचे द्योतक म्हणजे आपली भारतीय संस्कृती होय. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेले आपले राज्य आहे. याला राजा नसतो. लोकप्रतिनिधी पंतप्रधान होतो.

तो आपले सहकारी, मंत्री ठरवतो आणि भारताचा गाडा, सरकार बनवून चालवतो. त्यावेळी पंतप्रधान प्रत्येक मंत्रीगण, खासदार यांच्यात आचार-विचार व उच्चार यांचा ताळमेळ त्यांच्या वर्तनातून दिसला पाहिजे. इथे समर्थ रामदास म्हणतात, ‘बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पाऊले.नेते मं ळीचे योग्य आचरण, त्यांची योग्य जीवनपद्धती हेच खरे तर आपल्या भारतीय

सुसंस्कारित जीवनाचे महान तत्त्व आहे. आजकाल अनेक प्रकारचे प्रकरण, घोटाळे, रुपयाचे अपहरण हे चालूच आहे. याने समाज ढवळून निघतो आहे, ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, असे जनतेला वाटते. अशा वेळी राजकीय नेत्याची तुलना श्रीरामाबरोबर मनातल्या मनात सहज केली जाते. श्रीराम हा एक आदर्श राजा होता. शिस्तप्रिय होता. जनतेच्या मनात आदर होता. रामपण सर्वांशी आदराने,

योग्य मान देऊन वागणारा होता. पण राज्यातल्या एका सामान्य अशा धोब्याने कपडे धुता-धुता शेजारच्या माणसाला म्हटले, ‘आपली सीतामाई रावणाकडे इतके दिवस राहून आली, ती शुद्ध असेल का?’ ही शंका श्रीरामाच्या कानावर गेल्यावर त्याच्या मनात विचार आला,

आपण राजाराणीम्हणून इथे तो काहीच बोलला नाही, पण मनात त्याला आपली राणी शुद्ध वाटत नाही, पण मला माहीत आहे सीता ही दिव्यत्वाने झळाळून बाहेर आली आहे. हे धोब्याला सांगून खरं वाटेल का? आपण बोललो तर सीतेची - बायकोची बाजू घेतो असे होईल. सीतेला कोणी बदनाम करू नये, म्हणून लक्ष्मणाला सांगितले की सीतेला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात सोडून ये, कारण तिलाही आश्रमांत राहण्याचे डोहाळे लागले होते. हे

निमित्त्य साधून श्रीरामा नी सीतेचा त्याग केला. केवढे मोठे योगदान जनतेसाठी केले. सामान्य माणसाचे मन जाणणारा राजा कोठे? आपलेच मत जनतेला स्वीकारायला लावणारे पुढारी कोठे? आपल्या भारतमातेवर सतत अतिरेकी

हल्ले होत असतात. आपली सीमारेषा सुरक्षित नाही. आपले जवान अहोरात्र जागता पहारा देतात. जेव्हा जेव्हा हल्ले होतात, तेव्हा तेव्हा ते परतून लावतात आणि आपल्यासारखे सामान्य नागरिक बिनधास्त राहत असतो. संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्‍या आपल्या सैनिकांनाच श्रेय द्यायला हवे,

असे आम्हा नागरिकांना मनापासून वाटते. जशी भारताकडे फौज आहे, तशीच वानरांची फौज श्रीरामांकडे होती, राम हे पराक्रमी होते, एकबाणी होते, त्यांचा बाण कधीच वाया जात नसे. रावणासारख्या राक्षसाला श्रीरामांनी ठार केले. वानरसेनेला घेऊन युद्ध केले. तसेच अतिरेकी हेही एक प्रकारचे असुरी राक्षसच आहेत. बलशाली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नामोहरम करतात.

भारतही प्रतिहल्ला करून त्यांना परतून लावतो. रावणही बलशाली होता. महादेवाचा आवडता भक्त होता. रावण ह्या आध्यात्मिक शक्तीचा विपरीत उपयोग करतो, असे जेव्ह महादेवांना जाणवले, तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन विचार-विनिमय करून श्रीरामांना सर्व शक्तीनुसार रावणाचे प्राण घेण्यास प्रवृत्त केले.

सीता हरणहे निमित्य होते. उरी, पुलवामा या हल्ल्याच्या वेळीह विचारविनीमयांनी योग्य पाऊल उचलले. जनमानस याचा सार्थ अभिमान आम्हां भारतीयांना आहे. आता जे राज्य येईल ते जनतेला शांती समाधान देणारे असो. इथे महाराष्ट्रात श्रींचे राज्य यावे ही समर्थ रामदासांची इच्छा होती. छत्रपती शिवाजी राजांनी प्रयत्नपूर्वक श्रम करून आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण केली. पण याचा अभिमान छत्रपतींनी कधीच केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले मंत्रिगण, फौज, मातबर लोक, एकनिष्ठ सेवक, आपल्या आयुष्यावर उदार होऊन काम करण्यात सतत तयार असत. काम चोख व प्रामाणिक असे. आपले निवडून येणारे आमदार, खासदार सर्वजण नि:स्पृह, प्रामाणिक व समाधानी असावे, देशाशी एकनिष्ठ असावे. सामान्य जनतेला आता तरी आपल्या भारतात परत एकदा रामराज्य यावे, असे वाटते. सर्वांनी न कंटाळता योग्य नेत्याला मत द्यावे. मतदानाने आपला हक्क बजावावा. सौ. सुनीता  लांडगे

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 39

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds