";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सोन्याचा कळस कशाला हवा?

सोन्याचा कळस कशाला हवा?

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

देशासह - महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाने, सुवर्ण मंदिर, अक्षरधाम, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साई व सिद्धिविनायक मंदिराची शिखरे सोन्यानी मढवली आहेत. त्यात आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची भर पडणार आहे. कारण, या मंदिराची पाचही शिखरे सोन्याने मढवली जाणार आहेत. ही शिखरे लोकसहभागातून तसेच मुंबईचे

सरकारी वकील अ‍ॅड. अविनाश जामखेडकर यांनी एक किलो सोने देण्याची तयारी दर्शवली आहे. खरे तर आपल्या देशात आणि महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात स्वातंत्र्यानंतरच्या 72 वर्षात अद्यापही आदिवासी, ग्रामीण भागात धड रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही की वीज नाही. तालुका-जिल्हा पातळीवर म्हणावी तशी इस्पितळे नसल्यामुळे आजारी लोकांना व गरोदर स्त्रियांना, विषबाधितांना प्राणास मुकावे लागते. शाळा हायस्कूल जवळपास मंदिरांचे कळस सोन्याचे कशासाठी? नसल्याने मुलांना शिक्षण घेणे आज दुरापास्त झाले आहे. लाखोंच्या संख्येने शेतकरी व त्यांची बायका-मुले, तसेच बेरोजगार

आत्महत्या करतात. असे सगळे असताना आणि ठिकठिकाणी देवळातले सोन्या-चांदीचे देव व सोन्याचे कळस कशाला? तिजोरीपेटी फोडून त्यातील पैसे चोर चोरून नेण्याचे प्रकार घडत असताना, मंदिराला सोन्याचे दागिने अर्पण करण्याची हाव का? सोन्याचा कळस कशाला हवा? तोच पैसा जर रस्ते, शाळा, वीज किंवा खेड्यापाड्यातून नदीवरून जाणारे छोटे पूल अशा विधायक कामासाठी वापरला तर जिवंत माणसाचा दुवा त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुज्ञानी जरूर विचार करावा. राजेंद्र लंकेश्री

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 153

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds