";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अजित पवारांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ

अजित पवारांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई - शरद पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असताना शुक्रवारी अजित पवारांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली. शरद पवार यांनाही या निर्णयाची कल्पना नव्हती. असे असले तरी, ३ दिवसांपूर्वी अजितदादांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना फाेन करून ‘तुम्ही मुंबईत कधी येणार?’ अशी विचारणा केली हाेती. ‘तूर्त नाही’ असे बागडेंनी उत्तर दिल्यामुळे दादांनी फाेन करण्याचे कारण सांगितले नव्हते. मात्र, त्याच वेळी राजीनाम्याचा निर्णय पक्का झाला हाेता,’ अशी माहिती समाेर आली आहे. एक-दोन दिवसांत स्वतः अजितदादा राजीनाम्याचे कारण स्पष्ट करणार आहेत.

अजितदादांच्या राजीनाम्याची बातमी कळताच पत्रकारांनी बागडे यांना फाेन करून खातरजमा केली. त्या वेळी बागडे म्हणाले, ‘सायंकाळी दादांचे पीए माझ्या मुंबईतील कार्यालयात गेले. ‘पीएस’ची भेट घेतली. त्यांनी बागडेंना फाेन लावून दिला. त्यावर पीएंनी ‘अजितदादा राजीनामा देऊ इच्छित आहेत,’ असे सांगून बागडेंचे थेट दादांशी फाेनवर बाेलणे करबन दिले. दादांनी राजीनाम्याचा निर्णय सांगितला. त्यावर मी चकित झालाे. एवढा तडकाफडकी निर्णय का? असे विचारले असता ‘नंतर बाेलू’ एवढेच उत्तर त्यांनी. ‘निवडणूक लढवणार नाही का?’ असा प्रश्नही त्यांना केला असता ‘नंतरच बाेलू’ असे दादांनी सांगितले. खरे तर ३ दिवसांपूर्वीही दादांनी मला फाेन करून मुंबईत कधी येणार आहात?’ असे विचारले हाेते, मात्र तूर्त मी येणार नसल्याचे त्यांना सांगितले हाेते,’ असेही बागडेंनी नमूद केले. यातून दादांना तीन दिवसांंपूर्वीच राजीनाम्याचा निर्णय कळवायचा हाेता, असा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.

शरद पवारांसाठी पक्ष रस्त्यावर, अजित पवारांची पाठराखण नाही सहकारी बँक घाेटाळ्यात ईडीने शरद पवारांसह अजितदादांवरही गुन्हे दाखल केले. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शुक्रवारच्या आंदाेलनात फक्त शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याबद्दल संताप व्यक्त करत हाेते. अजित पवारांचा पाठराखण करताना काेणीही नेते, कार्यकर्ते दिसले नाहीत. त्यामुळे सिंचन घाेटाळ्याप्रमाणे आता या घाेटाळ्यातही आपण अडकत असताना पक्ष पाठीशी नसल्याने नाराज दादांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 24

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds