";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भ्रष्टाचारी नेत्यांना जेलची हवा कधी

भ्रष्टाचारी नेत्यांना जेलची हवा कधी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारात भाजप-शिवसेना युतीने राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचारी नेत्यावर तोफ डागून त्यांना आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही सहकारी बँकासह झालेल्या अनेक प्रकरणांतील झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांना जेलची हवा खायला लावू, अशा वल्गना केल्या होत्या. पण युतीचे सरकार सत्तेत येऊन गेली 5 वर्षे झाली, एक मा. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सोडल्यास कोणावर कारवाई झाली नाही.

अजितदादांनी 74 हजार कोटींचा घोटाळा केला म्हणे! खरं तर सिंचन प्रचंड घोटाळ्याची गैरव्यवहाराची? सी.बी.आय.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती होती. जनहित याचिकाही जनमंच या संस्थेने नागपूर खंडपीठात दाखल केली.

कारण अजितदादा व सुनील तटकरे यांच्या विरोधात आतापर्यंत शासनाने गुन्ह्यांची नोंद केली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शना आणून दिले. जर आरोपीची चौकशी होऊन भ्रष्टाचार केलेला निधी परत मिळवता, तर रखडलेले अनेक प्रकल्प तरी यातून पूर्ण करण्यासाठी सदर निधीचा वापर करता येईल अशी विनंतीदेखील त्यांनी केली. त्यानंतर दुसरा मोठा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा अजित पवारांसह 31 बँक संचालक आणि अनेक मान्यवर अशा 70 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेने माता रमाबाई 

 आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात साखर कारखाने, सूत गिरण्यांना बेहिशोबी कर्ज पुरवठा करण्यासोबतच झालेल्या अन्य आर्थिक गैरव्यवहारांतून तब्बल 25 हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी फौजदारी जनहित याचिकाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने

कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटपकरण्याचा ठपका ठेवून सदर गैरव्यवहार प्रकरणी आरोपांची कसून चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला आपला अंतिम निकाल देऊन या 70 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

पण यात आजी-माजी मंत्री व वजनदार नेते सताना त्यांच्यावर कारवाई होईलच याची शाश्‍वती सर्वसामान्यांना नाही. कारण, यासाठी सरकारची अनास्थाच दिसते नाहीतर आतापर्यंत कारवाई होऊन हे सगळे चार भि तीच्या आत डांबले गेले असते!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 106

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds