";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- गर्दीतला माणूस ,शांताराम विनायक मोडक

गर्दीतला माणूस ,शांताराम विनायक मोडक

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

22 सप्टेंबर उजाडला तोच एका चांगल्या गर्दीतल्या माणसाच्य निधनाची बातमी घेऊन अन् मग सगळा गाव एखाद्यानं दत्तक घ्यावा अशी गर्दी त्यांच्या घरापुढेत्यांच्या अंत्यदर्शनासाठी झाली. त्या गर्दीत जिव्हाळ्यानं जपलेलीच असंख्य माणसं होती. तेव्हाही त्यांच्या मनात अशी शंका होती की,

आपण ऐकलेली बातमी अफवा ठरो. कार शांताराम विनायक मोडक या सात्विकहसर्‍या चेहर्‍याच्या माणसानं जग सोडल्याची बातमी अनेकांना सहनच झाली नाही. गेली सुारे 45 वर्षे तळेगावात वास्तव्य केलेलावयाची 77 वर्षे आनंदाने पूर्ण केलेला एक लोकोत्तर माणूस अचानक गेला कसाअशीच चर्चा  गटागटानं सुरू झाली. शांत स्वभाव,

हसतमुख राहणंकोणीही आपल्या बोलण्यानं न दुखावणं आणि परिचयातल्याच नव्हे तर इतर कोणालाही केव्हाही नि:स्पृहपणे मदत करणंहाच त्यांचा स्थायी भाव होता. ‘बापू’ या नावानं ओळखले जाणारे मोडकसाहेब शासनाच्या महसूल खात्यात काम करत होते. पुणे आणि वडगाव मावळ इथे त्यांची एकूण कारकीर्द गेली. या महत्त्वाच्या खात्यामुळे त्यांचा मित्रपरिवार इतका मोठा होता की बस्स!

नायब तहसिलदार पदावरून निवृत्त झालेले मोडक बापू तळेगावामध्ये अनेक संख्याशी निगडित होते. कलापिनी शेजार नागरिक संघज्येष्ठ नागरिक संघगणेश मोफत वाचानालयहास्यक्लबकाव्यमंचगजानन महाराज मंदिरविठ्ठल मंदिर इथं ते हमखास दिसायचे. गाण म्हणणंगप्पा मारणंटिंगलटवाळी न करणंचांगल्या कलाकृतीला त्वरित दाद देणंवाचन करणंप्रामाणिकपणे जगणं हाच त्यांचा जीवनाविषयक दृष्टिकोन होता.

त्यांची वृत्ती आनंदी होती. निखळ मैत्री करणेहा गुण त्यांच्यात असल्याने माझ्यासारख्या तळेगावात उशिरा आलेल्या माणसांशी त्यांची घट्ट नाळ जमली. माझी अदबीनं चौकशी करणार्‍या या सद्गृहस्थाने 15 सप्टेंबर रोजी कलापिनीच्या ज्येष्ठांच्या गाण्याच्या स्पर्धेत माणसाच्या जीवनाचं मर्म सांगणरं गाण म्हटलं, ‘कशासाठी आटापीटाकशासाठी धावमाणूस तुझे नाव रे’ ‘माणूस तुझे नाव’. आणि या माणसाने खरोखरीच कोणतीही हाव’ धरली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी कोणालाही धावधाव करायला लावली नाही.

आज माणसांची गर्दी ओसंडून वाहत आहेत्यात माणूस शोधावा लागतो आणि मग हाताशी लागतात शांताराम मोडक.’ आपल्यामागे पत्नीदोन मुलंसुनानातवंडे ठेवून लोकांच्या हृदयात कायमची कालवाकालव ठेवून श्री. मोडक बापू गेले. अचानक तसा काहीही त्रास न होता गेलेहे त्यांचं भाग्य! आता कुठं शोधायचं त्यांना! हा प्रश्न त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना सर्वच मित्रांना होतो आहे.

15 सप्टेंबरचं गाणं बापूंचं अखेरचं गाण ठरलं! ईेशर त्यांना शांती देवो!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 132

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds