";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नवे संख्या वाचन

नवे संख्या वाचन

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

नव्या संख्या वाचन पद्धतीबाबत नारळीकर समितीने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी आणखी एक तज्ज्ञसमिती नेली जाणार असल्याचं वाचून आश्चर्य नाही वाटलं. विषय सोपा करून सांगणं हा उद्देश स्तुत्य असला तरी विषय किती सोपा करावा याला काही मर्यादा आहेत. म्हणूनच गुणाका ,

भागाकार या संकल्पना अस्तित्वात आल्या. अन्यथा गुणाकार म्हणजे एक प्रकाराची बेरीज व भागाकार म्हणजे एक प्रकारची वजाबाकी. परंतु गुणाकार, भागाकाराची उपयुक्तता पटल्यामुळे आपण गुणाकार, भागाकार शिकतो. नसता आपण अमुकवेळा मोजले की 31, तमूकवेळा मोजले म्हणजे 32 करीत बसलो असतो. असो. कुठलीही नवीन पद्धत सुचवितान  ती निर्दोष असावी ही अपेक्षा असते. परंतु नारळीकर समितीने सुचविलेल्या संख्या वाचन पद्धतीत दोन गोष्टी खटकतात. पहिली गोष्ट ही की गणितासारख्या काटेकोर विषयात एका संख्येची दोन नावे बरोबर वाट  नाहीत, एक तर वीस दोनतरी म्हणा किंवा बावीसतरी म्हणा. वीस दोनऊर्फ बावीसहा प्रकार योग्य वाटत नाही. दोन्ही प्रकारे संख्याबोध लक्षात ठेवणं अवघड नाही. कमीत कमी दोन नावं किती वर्षे वापरात असतील हे तरी सांगायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट वीस दोनप्रकारच्या संख्येचं अक्षरी लेखन

विनाकारण पाल्हाळीक होतं. एका शब्दाऐवजी दोन शब्द लिहावे लागतात. उदा. 97, 35, 825 या रकमेचा चेक द्यायचा आहे, तर ही रक्कम अक्षरी कशी लिहिली जाईल? नव्वद सात लाख तीस पाच हजार आठ शे वीस पाच फक्तअशी लिहिली जाईल. तर प्रचलित पद्धतीप्रमाणे सत्याण्णव लाख पस्तीस हजार आठशे पंचवीस फक्तअसे लिहिले जाईल.

पहिल्या प्रकारात 11 शब्द होतात, तर दुसर्‍या प्रकारात 8 शब्द होतात. लिखाण काम का वाढवून घ्यायचं? विषय अवघड होतो म्हणून? की शिक्षण कौशल्य कमी पडतं म्हणून? या सर्व गोष्टींचा विचार नवीन तज्ज्ञ समिती करीलच! मधुकर पानट

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 140

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds