";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.

आनंद

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

गोडहा शब्द उच्चारताच आपल्या मनाला एक वेगळीच अनुभूती होते आणि निरनिरळ्या गोड पदार्थांच्या चवी स्मृतिपटलावर तरळू लागतात, अगदी त्याचप्रमाणे आनंदहा शब्द उच्चारल्यावरही मनाला एकप्रकारचा सुकून मिळतो. भूतकाळतील आनंदाचे क्षण आपण पुन्हा अनुभवू लागतो. तथाप व्यक्तिपरत्वे आनंदाची व्याख्या वेगवेगळी असते. मुळात आनंद ही घेण्याची गोष्ट नाही, ती देण्याची गोष्ट आहे. जितका जास्त आनंद आपण दुसर्‍याला देऊ त्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला आपोआप परत मिळेल. दुसर्‍यामुळे आपल्याला आनंद मिळेलही,

पण आपल्यामुळे आनंदी झालेल्या व्यक्तींना पाहून आपल्याला जे समाधान, जो आनंद मिळतो, त्याला कशाचीही सर येणार नाही. मुख्य म्हणजे दुसर्‍यांना आनंद देण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, आणि कोणीही मला आनंद नकोअसे म्हणणार नाही. म्हणजे आपल्याला मिळणार्‍या आनंदाची 100 टक्के गॅरंटी! आहे की नाही गंत? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद हा मानण्यावर आहे. ही मनाची शुद्ध, सात्त्विक स्थिती आहे. हास्यविनोदहा आनंदाचा कधीही न आटणारा झरा आहे. त्यामुळे प्रत्येकाने विनोदबुद्धी जोपासली पाहिजे. जपान देशात 100 वर्षावरील


 वयाचे 1000 पेक्षा जास्त लोक आनंदाने जीवन जगत आहेत. एकदा त्यांच्यातील सर्वात तरुण (115 वर्षे) व्यक्तीला त्यांच्या निरामय अशा दीर्घायुष्याच्या रहस्याबद्दल विचारले असता त्यांनी (अर्थातच) हसून उत्तर दिले, “माझ्या मनात सतत हास्याचा- आनंदाचा झरा वाहात असतो.जी व्यक्ती आपल्या मनावर अंकुश ठेवू शकते, मनाला प्रसन्न ठेवू शकते, त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही आनंदाला तोटा नसतो. प्रसन्नचित्त व्यक्तीबरोबर लोक मैत्री करू पाहतात. ज्याला त्याच्या स्वभावाशी जुळणार्‍या स्वभावाचे मित्र मिळतात.

त्याला दु:खाचे क्षण स्पर्शही करू शकत नाहीत. परिस्थिती कशीही असो, ती व्यवस्थितपणे हाताळण्याची क्षमता ज्याने प्राप्त केली, त्याचे जीवन सार्थ झाले असे समजावे. आनंदी व्यक्तीपेक्षा श्रीमंत असा कोणीही या जगात सापडणार नाही. हिंदी भाषेतील एक सुविचार आठवला, त्याचा येथे उल्लेख करणे प्रासंगिक ठरेल - सारी जिंदगी आनंदकी, खुशी कीnतलाशमें गुजर गयी, जीवनके अंतिम दिनोंे पता चला की, आनंदी और खुश तो वो लोग थे, जो आनंद और खुशियाँ दुसरोंको बाँट रहे थे।

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 66

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds