";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महेश मोतेवारांची पळापळ

महेश मोतेवारांची पळापळ

E-mail Print PDF

Add this to your website

कोठडी टाळण्यासाठी महेश मोतेवारांची पळापळ

पुणे: समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांनी कोठडी टाळण्यासाठी पळापळ सुरु केली आहे. मोतेवारांना काल सोलापूरमध्ये उपाचारासाठी दाखल केलं, त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यता आलं.

मोतेवार यांच्या वैद्यकीय प्रकृतीची माहिती प्रत्येक १२ तासाला कळवा,असे आदेश उस्मानाबादच्या उमरगा न्यायालयानं दिले आहेत.

मोतेवार यांच्यावर गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप आहे. त्याशिवाय डेअरी प्रकल्पात केलेल्या फसवणुकीमुळे त्यांच्याविरोधात तक्रारही देण्यात आली आहे. त्यासंदर्भात उमरगा न्यायालयात काल त्यांनी हजर राहणं अपेक्षित होतं., मात्र, प्रकृतीचं कारण देत ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.

फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार यांना CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं होतं. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडत नव्हते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427 , 491, 34 कलमांअंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवार यांना फरार घोषित केलं होतं.
काय आहे प्रकरण ?

शिवचंद्र रेवते आणि सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा यांच्या भागीदारीत येनेगूर येथे रेवते अॅग्रो कंपनी होती. त्यात पुढे या भागीदारीत फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब शिवगौंडा यांची फसवणूक करत सदर कंपनी महेश मोतेवार यांना 85 लाखात विक्री केली.

त्यामुळे शिवगौंडा यांनी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. फेब्रुवारी 2010 मध्ये गुन्हा नोंदवला गेला, यात महेश मोतेवार हे सह आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणात महेश मोतेवार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोतेवारांना घोषित केले आहे.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 189

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds