";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जर मोदींबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य केले, तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे साहित्य संमेलन उधळून लावतील

जर मोदींबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य केले, तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे साहित्य संमेलन उधळून लावतील

E-mail Print PDF

Add this to your website

 

…तर साहित्य संमेलन उधळून लावू : रामदास आठवले

पिंपरी-चिंचवड पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असून त्यांच्याविरोधात श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा अपशब्द काढले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

 

चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांना आठवले यांनी आपल्या नेहमीच्या बेधडक वृत्तीने उत्तरे दिली.

आठवले म्हणाले की, गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगल ही देशातील सर्वात विघातक घटना होती. परंतु त्या गोष्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे. नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असून प्रत्येक जाती-धर्माचा ते मान ठेवतात. त्यामुळे कोणीही उठावं व मोदी यांच्यावर आरोप करावेत हे आरपीआयचे कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत.

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा जर मोदींबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य केले, तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 194

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds