";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी सकाळी निधन

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी सकाळी निधन

E-mail Print PDF

Add this to your website

मुफ्ती मोहम्मद सईद (फाइल फोटो)

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांनी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 22 डिसेंबर पासून त्यांच्यावर येथे उपचार सुरु होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)-भाजप सत्तेत आल्यानतंर ते मुख्यमंत्री झाले होते.

कोणता होता आजार
79 वर्षीय मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या रक्तातील पेशी कमी झाल्या होत्या. त्यावर एम्समध्ये उपचार करण्यात आला होता, त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती.

कोण होते मुफ्ती मोहम्मद सईद
- जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 1 मार्च रोजी मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. ते राज्याचे गृहमंत्री देखिल होते.
- काश्मीरमधील राजकारणातील सईद हे मोठे प्रस्थ होते.
- काश्मीर खोऱ्यातील बिजबेहार येथे 12 जानेवारी 1936 रोजी सईद यांचा जन्म झाला होता. 1987 पर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते.
- 1987 मध्ये सईद काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासोबत गेले.
- 1989 मध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. हे पद भूषविणारे ते पहिले मुस्लिम नेते होते.
- 1999 मध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) स्थापन केली.
- 2002 ते 2005 पर्यंत काँग्रेससोबत आघाडी करून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
- 2008 मध्ये जम्मू-काश्मारी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 18 जागा मिळाल्या.
- 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 29 जागा मिळाल्या.
- यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
मुलीचे दहशतवाद्यांनी केले होते अपहरण
मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर काही दिवसांनी दहशतवाद्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलीचे - डॉ. रुबिया सईद हिचे अपहरण केले होते. तेव्हा रुबिया एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. कॉलेजहून परतताना दहशतवाद्यांनी तिचे अपहरण केले होते. तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. फारुख अब्दुल्लांचे सरकार होते. ते लंडन दौरा अर्धवट सोडून तत्काळ भारतात परतले होते.
रुबियाला सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांनी तरुंगात कैद पाच दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीच्या सुटकेसाठी पाच दहशतवाद्यांना सोडण्याची अट मान्य करण्यात आली होती, मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठली होती.

का सोडली होती काँग्रेस
- 1972 ते 1975 दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद विधान परिषदेत काँग्रेसचे नेते होते. 1977 मध्ये ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.
- त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे, की इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत शेख अब्दुल्लांसोबत करार केला होता.
- त्यानंतर 1977 मध्ये सईद त्यांच्या पारंपरिक बिजबेहार मतदारसंघात पराभूत झाले होते. 1983 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
- त्यानंतर सईद पुन्हा नरसिंहराव यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये सहभागी झाले.
- त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडली आणि 1999 मध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) स्थापन केली.
पीडीपी आणि भाजप यांची राज्यात सत्ता आल्यानतंर गेल्यावर्षी 1 मार्च रोजी ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यानंतर त्यांची कन्या महबुबा मुफ्ती यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे. स्वतः मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दोन महिन्यांपूर्वी महबुबा राज्याच्या भावी मुख्यमंत्री असल्याचे सुतोवाच केले होते. एका पत्रकार परिषदेत सईद म्हणाले होते, की महबुबा यांना लोकांची नाळ कळलेली आहे, त्याच राज्याच्या पुढच्या मुख्यमंत्री असतील. मला सर्वसामान्यांना वेळ देणे शक्य होत नाही, मात्र त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्या जनसामान्यांसाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चांगले काम करु शकतात.
सईद म्हणाले होते, मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसून असलो तरी फिल्डवर त्याच काम करत असतात. मेहबुबा या काश्मीर खोऱ्यात पक्षाचे नेतृत्व करतात.
मेहबुबा मुफ्ती या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत. सईद यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर त्या उमर अब्दुल्लांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
- 2002 मध्ये मेहबुबा पहलगाम येथून विजयी झाल्या होत्या. 2004 मध्ये त्या कांग्रेससोबतच्या आघाडीमध्ये सहभागी झाल्या आणि लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या.
- आता मेहबुबा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 246

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds