";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तलवारीचे वार

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तलवारीचे वार

E-mail Print PDF

Add this to your website

 आंतरजातीय विवाह केल्याने नगराध्यक्षाच्या जावयाचा खून; पंढरपुरातील घटना

पंढरपूर- आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तलवारीचे वार करून सोमनाथ बाळकृष्ण टाकणे (वय ३१, रा. पंढरपूर) या तरुणाचा खून केल्याची थरारक घटना बुधवारी रात्रा पंढरपूरमध्ये घडली. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून तिचेच वडील व नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांच्यासह बारा नातलगांविराेधात शहर पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

यापैकी आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून चार जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी िमळाली आहे. दरम्यान, मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संबंध तोडल्याने खुनानंतर बुधवारी (दि. ६) रात्री त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. गुरुवारी (दि. ७) दुपारी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस संरक्षणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पृथ्वीराज अनिल भोसले, शैलेश ऊर्फ शैलेंद्र शशिकांत भोसले, प्रसाद शशिकांत भोसले, प्रवीण शशिकांत भोसले यांना पोलिस कोठडी िमळाली आहे. संदीप अनिल भोसले, अभय शहाजी भोसले, दिनेश प्रकाश भोसले, नीलेश प्रकाश भोसले अशी अटकेतील अन्य संशयितांची नावे आहेत, तर विश्वजित सुनील भोसले, किरण विठ्ठल भोसले, विशाल िकरण भोसले, वैभव शहाजी भोसले (सर्व रा. भोसले चौक, पंढरपूर) यांच्यासह अन्य तीन ते चार संशयितांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

बुधवारी रात्री मुलगा हर्षवर्धन यास जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने सोमनाथ, त्याची पत्नी सौदामिनी हे त्याला घेऊन दुचाकीने दवाखान्यात गेले होते. उपचारानंतर ते शिवाजी चौकमार्गे अर्बन बँक रस्त्याने घरी िनघाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास भादुले चौक परिसरात पाठीमागून दुचाकीवर काही संशयित अाले. विशाल भोसले याच्या हातात पिस्तूल होते. इतरांच्या हाती कोयते होते. पृथ्वीराज भोसले याने सोमनाथच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकल्याने ितघेही गाडीवरून खाली पडले. त्या वेळी पृथ्वीराज भोसले याने ‘तू अामच्या समाजाची पोरगी पळवून नेऊन लग्न केले अन‌् पुन्हा पंढरपुरात येऊन आमच्या उरावर राहतोस काय, तुझा आता खूनच करतो’, अशी दमदाटी केली. या सर्वांनी कोयत्याने सोमनाथच्या डोक्यात वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सौदामिनी हिने िफर्याद िदली.
नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांची कन्या सौदामिनी व सोमनाथ टाकणे यांच्यात प्रेमसंबंध होते. आठ जानेवारी २०१४ रोजी कुटुंबीयांचा विरोध डावलून दोघांनी विजापूर येथे नाेंदणी पद्धतीने आंतरजातीय विवाह केला हाेता. काही दिवस तेथेच राहिले. त्यानंतर दोघे उस्मानाबादेत राहिले. तेथे त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव हर्षवर्धन आहे .

कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण
पंढरपूरमधून पळून गेल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि भाऊबंदांनी सोमनाथ टाकणे यांचे आईवडील व भावाला बेदम मारहाण केली. तसेच इतर टाकणे कुंटूबियांना मारहाण करून त्यांच्या घराची तोडफोड केली. त्यांना शहरातून हाकलून दिले . मुलीच्या आईवडीलांसह नातेवाईकांच्या भीतीमुळे टाकणे कुटुंबियांनी शहर सोडले हाेते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 208

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds