";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- साहित्य संमेलन: पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी सज्ज! आज ग्रंथदिंडीने सुरुवात

साहित्य संमेलन: पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी सज्ज! आज ग्रंथदिंडीने सुरुवात

E-mail Print PDF

Add this to your website
12 ते 15 हजार साहित्य रसिकांना सामावून घेणारा मुख्य मांडव, आतमध्ये 120 फूट लांबीचे तितकेच भव्य व्यासपीठ, त्यावर 200 एलईडी दिवे आणि मंडपात 1200 एलईडी दिव्यांचा शुभ झगमगाट साहित्याची पूजा करणार्‍या सारस्वतांसाठी करण्यात आला आहे.
पुणे- मकर संक्रातीच्या गोड सणासोबत मायमराठी भाषेतील साहित्यगोडी निर्माण करणार्‍या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी आता सज्ज झाली आहे. पिपरीमधील हिंदुस्थान ऍण्टिबायोटिक्स कंपनीच्या 40 एकराच्या मैदानावर आता संमेलनाचा भव्य मंडप मोठ्या दिमाखात उभा राहिला असून साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी तयार झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात संमेलनाचे निमंत्रण देणा-या कमानी, भव्य फलक लावल्याने संपूर्ण शहर साहित्यमय झाले आहे.
 
आज ग्रंथदिंडी, 10 हजार लोक सहभागी होणार-
 
आज दुपारी दोन वाजता पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होत असलेल्या ग्रंथदिंडीमध्ये दोन हजार महिला पारंपरिक पोषाखात सहभागी होणार आहेत. या महिला दिंडीमध्ये 16 प्रकारचे विविध खेळही सादर करतील. त्यात मंगळागौरीतले खेळ, तसेच मलखांब, तलवारबाजी, ढोल ताशा, तसेच पौराणिक, ऐतिहासिक आणि साहसी खेळांचेही प्रदर्शन त्यात करण्यात येईल. या ग्रंथदिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल व सहित्य रसिक श्रीनिवास पाटील पालखीतील पवित्र ग्रंथांचे पूजन करून करणार आहेत. या दिंडीत शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून साहित्यिक, रसिक आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिक मिळून सुमारे 10 हजार साहित्यप्रेमी त्यात सहभागी होतील, अशी माहिती ग्रंथदिंडीच्या समन्वयक मृदुल महाजन यांनी दिली.
 
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षता-
 
ग्रंथदिंडीचा मार्ग तसेच संमेलनस्थळाची सुरक्षितता व वाहतुक या दृष्टीने सहाय्यक पोलिस आयुक्त महेंद्र रोकडे आणि भीमराव गजरे यांनी पाहणी केली. रोडके म्हणाले की, ग्रंथदिंडी चालू असताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पिंपरी भागात गर्दीच्या किमान 16 ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात येतील. तसेच महत्त्वाच्या आणि अती महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या वाहने लावण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 193

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds