";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुरूड बीचवर ट्रीपला गेलेल्या पुण्यातील 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

मुरूड बीचवर ट्रीपला गेलेल्या पुण्यातील 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

E-mail Print PDF

Add this to your website

4 मुलांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुलांना टांग्यातून नेताना...

 

पुणे - मुरूडला (जि. रायगड) सहलीवर गेलेल्या पुण्याच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या 14 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ऐन भरतीच्या वेळी हे विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरल्याने ही आपत्ती ओढवली. मृतांत 10 विद्यार्थिनी व 4 विद्यार्थी आहेत. 6 विद्यार्थिनींना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी 13 जणांचे मृतदेह सापडले होते. तर मंगळवारी सकाळी बेपत्ता एका मुलाचा मृतदेह सापडला आहे.

कॉम्प्युटर सायन्स विभागातील बीएस्सी व बीसीए अभ्यासक्रमाचे 66 विद्यार्थी, 50 विद्यार्थिनी, 11 शिक्षक असे एकूण 127 जण तीन बसने सोमवारी दुपारी दाेनला मुरूडला पोहोचले. एकदरा समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांच्या विरोधानंतरही काही जण समुद्रात उतरले. भरतीमुळे पायाखालील वाळू वेगाने सरकून तोल गेल्याने ते पाण्यात कोसळून समुद्रात ओढले गेले. भरतीच्या पाण्यामुळे त्यांना बुडताना कोणीही मदत करू शकले नाही. मच्छीमारांनी तातडीने बोटी समुद्रात नेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर 10 मुलींसह 4 मुलांचा मृत्यू झाला.

दोन हेलिकॉप्टरने बेपत्तांसाठी शोधमोहीम
मुरूड येथे शैक्षणिक सहलीवर आलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांपैकी 14 जण भरती आली असताना समुद्रात उतरल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. वाचवलेल्या 6 विद्यार्थ्यांवर मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तटरक्षक दल, मरीन पोलिस, महसूल अधिकारी, स्थानिक नागरिक बुडालेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रायगडचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दांडले यांनी सांगितले.

दरम्यान, समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी तटरक्षक दल व स्थानिक मच्छीमारांची मदत घेण्यात येत आहे. तटरक्षक दलाचे दोन चेतक हेलिकॉप्टर, एक सी -किंग हेलिकॉप्टर व जहाजाच्या मदतीने बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, बचावकार्य सुरू हाेईपर्यंत सूर्यास्त झाल्यामुळे अंधारात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात तटरक्षक दल, मरीन पाेलिसांसह मदत आणि बचाव यंत्रणांना अडथळे येत आहेत.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 209

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds