";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मनी लाँडरिंग प्रकरणात भुजबळांचे पुतणे समीर अटकेत

मनी लाँडरिंग प्रकरणात भुजबळांचे पुतणे समीर अटकेत

E-mail Print PDF

Add this to your website

मुंबई - मनी लाँडरिंग प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांच्या नऊ मालमत्तांवर छापे टाकून झाडाझडती घेतल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

ईडीच्या बलार्ड पियर येथील कार्यालयात समीर यांची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. समीर भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांना कोठडीत घेऊन चौकशी करणे गरजेचे बनल्यामुळे अटक करावी लागल्याचा ईडीचा दावा आहे. तत्पूर्वी ‘ईडी’च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातील 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी दिवसभर छगन भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीर आणि इतरांच्या मालमत्ता व कार्यालयांवर 9 ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. त्यानंतर समीर भुजबळ यांची तब्बल सहा तास चौकशी करून अटक करण्यात आली. समीर भुजबळांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि मुंबईतील कलिना ग्रंथालय भूखंड घाेटाळ्यातील पैसा आर्मस्ट्राँग एनर्जी व आर्मस्स्‍ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर या भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या सिंगापूरस्थित कंपन्यांमार्फत इंडोनेशियातील कोळसा खाणीच्या व्यवहारात गुंतवल्याचा समीर व भुजबळांचे पुत्र पंकज या दोघांवर आरोप आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ‘ईडी’ने नुकतेच दोघांनाही समन्स बजावले होते. त्यानुसार सोमवारी समीर बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.
 
मुंबई उच्च न्यायालयाने एसीबी आणि ईडीला भुजबळ यांच्या विरोधातील आरोपांची संयुक्तपणे चौकशी करण्यास सांगितले होते. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान या तपासाबाबतचा सविस्तर अहवाल येत्या चार आठवड्यात न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर ईडीने कारवाईला वेग दिला. महाराष्ट्र सदनातील आर्थिक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ईडीने भुजबळ आणि त्यांच्या कुटंुबियांविरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत.
 
श्रेयासाठी सोमय्या-‘आप’मध्ये टि्वटर युद्ध
भुजबळ कुटुंबियांच्या विरोधातील कारवाईचे श्रेय घेण्यावरून भाजपचे खासदार किरिट सोमय्या आणि आम आदमी पार्टीत चढाओढ सुरू झाली. सोमय्या यांनी या कारवाईची माहिती अगोदर एसएमएसद्वारे दिली. त्यानंतर एक छोटेखानी पत्रकार परिषदेत आपल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई झाल्याचा दावा केला. मात्र ही कारवाई सोमय्या यांच्यामुळे नव्हे तर आपच्या याचिकेमुळे झाल्याचा दावा आपच्या प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी ट्वीटरद्वारे केला. तर अगोदर भुजबळ यांच्या विरोधातील तक्रारी मागे घेणारे सोमय्या आता त्यांच्या विरोधातील कारवाईचे श्रेय कसे घेऊ शकतात, असा सवाल अंजली दमानिया यांनी ट्वीटरद्वारे केला.
 
राजकीय आकसापोटीच कारवाई : राष्ट्रवादीचा आरोप
राजकीय आकसापोटी भाजपच्या इशाऱ्यावरून ईडीने कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या हे आधी वक्तव्य करतात आणि दोन दिवसांनी ईडी ही कारवाई करते, यातूनच या कारवाईमागील आकस स्पष्ट होतो, असे पक्षप्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 224

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds