";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नवसारीजवळ शुक्रवारी बस नदीत कोसळून 42 जणांचा मृत्यू ,महाराष्ट्रातील सहा प्रवाशांचा समावेश

नवसारीजवळ शुक्रवारी बस नदीत कोसळून 42 जणांचा मृत्यू ,महाराष्ट्रातील सहा प्रवाशांचा समावेश

E-mail Print PDF

Add this to your website

 गुजरातमध्ये बस नदीत कोसळली; 42 जणांचा मृत्यु, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 प्रवासी

 

नवसारी - गुजरातमधील नवसारीजवळ शुक्रवारी बस नदीत कोसळून 42 जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा प्रवाशांचा समावेश आहे.

गुजरात परिवहन निगमची बस उकईहून नवसारीकडे जात हाेती. सुपा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून जाताना समाेरून येणाऱ्या वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि २० फूट उंचीवरून बस नदीत काेसळली. परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य केले. २४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील मुबिनोद्दीन हफिजोद्दीन शेख (७०), रुकय्याबी मुबिनोद्दीन शेख (६०), निकहत परवीन सफिकोद्दीन शेख (३५, सर्व रा.नवापूर) व धुळ्यातील जगदीश रामकृष्ण कुलकर्णी (४६) व प्रफुल्ल दत्तात्रय कुलकर्णी (२८, रा. जीटीपी परिसर) हे ठार झाले. अपघातात ठार झालेल्या धुळ्यातील तिसऱ्या व्यक्तीचे नाव मिळू शकले नाही.

या अपघातात धुळ्यातील दाेन पुराेहित ठार झाले. चार जण नवसारी येथे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले हाेते. त्यापैकी एक जण सुरत येथे थांबला तर तिघे बसने धुळ्याकडे येत हाेते. त्यापैकी जगदीश कुलकर्णी (४६) व प्रफुल्ल कुलकर्णी (२८, रा. जीटीपी परिसर) हे ठार झाले. जगदीश कुलकर्णी यांनी काही वर्षांपूर्वीच पाैराेहित्याचे काम सुरू केले हाेते. नकाणे परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क हाेता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दाेन मुली, भाऊ असा परिवार आहे. तर प्रफुल्ल कुलकर्णीनेही पुराेहिताचे कामात नाव कमविले हाेते. पूजेचे काम संपवून ते घरी परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

दीपकुमार साळवे यांच्यामुळे कळाली माहिती : स्टेशन राेडवरील शिवप्रभू काॅलनीत राहणारे दीपकुमार साळवे यांचे मित्र नवसारी येथे राहतात. त्यांनी अपघात व त्यात धुळे येथील महाराजाचे आेळखपत्र मिळाल्याची माहिती साेशल मीडियाद्वारे कळविली. त्यानुसार चिताेड परिसरातील जगदीश कुलकर्णींची माहिती िमळाली.

३० जणांचे मृतदेह काढले : बसमधून प्रवास करणारे बहुसंख्य विद्यार्थी हाेते. रात्री उशिरापर्यंत ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. इतर जखमींना जवळपासच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात विसरणार नाही : मी नवसारीहून बारडाेली जाण्यासाठी बसमधून बसलाे. बस प्रवाशांनी खच्चाखच भरली हाेती. बस पुलावरुन जात हाेती. अचानक बस रांॅग साईडला गेली आणि जाेरात आवाज आला. सर्व जण घाबरले, आेरडायला लागले. बस नदीत जाऊन काेसळली हाेती. मला काेणी वाचवले मला माहीत नाही. परंतु या घटनेमुळे अजूनही माझे शरीर कापात आहे. हा अपघात मी कधीच विसरु शकत नाही. - ललितकुमार, शिरपूर
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 199

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds