";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण, 3.13 लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण, 3.13 लाख कोटींचे नुकसान

E-mail Print PDF

Add this to your website

 शेअर बाजार 800 अंकांनी कोसळला, 3.13 लाख कोटींचे नुकसान

 

मुंबई- भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 807 अंकांनी तर निफ्टी 239 अंकानी खाली घरसला. या घसरणीमुळे सेन्सेक्समधील 30 बड्या कंपन्यांचे बाजारमूल्य 3.13 लाख कोटींनी कमी झाले आहे. बीएसईच्या 30 शेअर कंपन्यांचा प्रमुख इंडेक्स सेंसेक्स 807 अंकांनी खाली घसरून तो 22951 या पातळीवर आला आहे. तर, एनएसईच्या 50 शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 200 अंकानी खाली येत तो 7000 हजारांच्या खाली आला आहे. 12 मे 2014 नंतर प्रथमच निफ्टी प्रथमच 7000 हजारांच्या खाली आल्याने बाजारात खळबळ माजली आहे. निफ्टीतील 50 पैकी तब्बल 45 कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. यात वेदांता, बीएचईएल, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर तब्बल 5 टक्क्यांनी खाली आहेत.

सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे भाव घरसले-
 
एनएसईमध्ये सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे भाव खाली आल्याचे दिसून येत आहे. बॅंक निफ्टी दोन टक्क्यांनी खाली येत 52 हप्त्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर प्रथमच खालच्या स्तरावर पोहचला आहे. ऑटो आणि मिडिया इंडेक्समध्ये सर्वात जास्त घसरण पाहायला मिळत आहे.
 
का पडतेय मार्केट-
 
- क्रूड तेलाच्या किंमती दिवसेंदिवस खाली खाली येत चालल्या आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत मोठा झाल्याचे दिसून येते.
- फेडरल रिझर्वचे चेअरमन जेनेट येलेन यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये सांगितले की, जागतिक बाजारात कोणतेही ग्रोथ दिसत नाहीये. मात्र व्याज दर कमी करण्याची काहीही गरज नाही. येलेन यांच्या वक्तव्यानंतर जगभरातील मार्केटवर दबाव वाढला. त्यामुळे बाजारावर परिणाम दिसून आला.
- लांबच्या सुट्टीमुळे आशियन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम जाणवत आहे.
 
एक्सपर्टचे काय आहे म्हणणे-
 
चोकसी सिक्युरिटीचे एमडी देवेन चोकसी यांनी सांगितले की, बाजारात जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केल्याने तो पडला आहे. बॅंकांना वाढत्या एनपीएची चिंता आहे. मात्र, बाजार आता बॉटम लेवलवर आहे. त्यामुळे भविष्यात तो आणखी खाली जाण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र बॅंकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक न करणे योग्य ठरेल.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 205

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds