";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुंबई- टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात ई-टोल सेवा सुरु

मुंबई- टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात ई-टोल सेवा सुरु

E-mail Print PDF

Add this to your website

 महाराष्ट्रासह देशभरात सुरु होणार E-Toll, टोल प्लाझावर लागणार नाहीत रांगा
 
मुंबई- टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात ई-टोल सेवा सुरु केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या अंतर्गत वाहनांवर एक स्टिकर लावले जाईल. बॅंकेत पैसे भरुन हे स्टिकर विकत घेता येईल. प्रत्येक प्रवासासाठी वारंवार स्टिकर घेण्याची गरज नसेल. त्यातील पैसे संपले, की ते रिचार्जही करता येणार आहे.

 

नितीन गडकरी यांनी मेक इन सप्ताहाला भेट दिल्यानंतर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, की टोल भरताना टोल प्लाझावर लांबच लांब रांगा लागल्या असतात. त्यात वेळेची, पेट्रोल-डीझेल आणि पैशांची नासाडी होते. त्यामुळे देशभरात ई-टोल नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत वाहन चालकांना बॅंकेतून ई-स्टिकर विकत घ्यावे लागेल. विशेष म्हणजे त्यातील रक्क्म संपल्यावर ते रिचार्जही करता येईल. त्यामुळे टोल प्लाझांवर थांबून रक्कम भरण्यासाठी वाहनचालकांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. याबाबत बॅंकांसोबत बोलणी झाली आहे. लवकरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

 

प्रदूषण नियंत्रणासाठी शहरांच्या वेशीवर वाहनतळ
सध्या शहरांमध्ये वाहनांमुळे प्रचंड प्रदुषण होते. यात शहराबाहेरुन येणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे अशा शहरांबाहेर सुमारे 350 वाहनतळ उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यात पेट्रोल पंपांपासून कोल्ड स्टोरेजपर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध असतील. त्यातून रोजगार उपलब्ध होईल. प्रदुषणाला आळा बसेल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 279

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds