";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतण्याचे वेध

शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतण्याचे वेध

E-mail Print PDF

Add this to your website

 बिहारमधील 'सिंघम' लवकरच महाराष्ट्र पोलिस दलात, मंत्र्याचा आहे जावई

बई- बिहार पोलिस दलात कार्यरत असलेले व दबंग, सिंघम अशी ख्याती मिळवलेले विदर्भीय पुत्र आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लवकरच महाराष्ट्र पोलिस दलात पाहायला मिळणार आहेत. सध्या बिहारची राजधानी पाटणा इथे कार्यरत असलेले लांडे यांनी आपल्या स्वगृही राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात ट्रान्सफरसाठी अर्ज केला आहे. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडे यांच्या अर्जाची दखल घेतल्याचे कळते आहे. तसेच राज्याचे पोलिस महासंचालकांना अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे कळते आहे.
 
शेतकरी कुटुंबातील आहेत शिवदीप-
 
शिवदीप लांडे हे अकोला जिल्ह्यातील पारस (ता. बाळापूर) येथील रहिवासी आहेत. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी येथे शिवदीप यांचा जन्म झाला. शिवदीप शेतकरी कुटुंबातील असून, त्यांची आई गीताबाई सध्या अकोला जिल्हा परिषदेत सदस्य तर भाऊ कालिंद हे पारसला ग्रामपंचायत सदस्य आहेत. बहीण कुंजन पाटील या गृहिणी आहेत. शिवदीप यांनी शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी मिळविली आहे. मुंबईत प्राध्यापक म्हणून काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. सुरुवातीला ते केंद्रीय उत्पादन व शुल्क विभागात रुजू झाले. कस्टममध्ये त्यांची पहिली नियुक्ती उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कोलकाता विमानतळावर झाली. त्यादरम्यान ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची 2005 मध्ये बिहार कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. पहिली पोस्टिंग बिहारच्या जमालपूर जिल्ह्यातील मुंगेर येथे झाली. त्यानंतर त्यांना पाटणा शहरात पोलिस अधीक्षकपदी नेमण्यात आले.
 
आपल्या दबंग कामगिरीमुळे शिवदीप हे पाटणातील युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनले. हिंदी मीडियासाठीसुद्धा ते 'हीरो' ठरले. त्यांच्या दबंगगिरीने पाटण्यातील गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पटण्याचा पोलिस अधीक्षक बनविले. त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या. त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली. त्यांच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केलेले आहे.
 
यादरम्यान, दबंग, सिंघम अशी ओळख निर्माण केली. तसेच डॅशिंग काम करीत राहिल्याने शिवदीप लांडे आख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले. तरूण-तरूणी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळतात. मात्र आता शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 234

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds