";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सेटलमेंटसाठी माल्यांची 6,868 कोटी रुपयांची ऑफर, पत्नी-मुलांची संपत्ती नाही सांगितली

सेटलमेंटसाठी माल्यांची 6,868 कोटी रुपयांची ऑफर, पत्नी-मुलांची संपत्ती नाही सांगितली

E-mail Print PDF

Add this to your website

सेटलमेंटसाठी माल्यांची 6,868 कोटी रुपयांची ऑफर, पत्नी-मुलांची संपत्ती नाही सांगितली

नवी दिल्ली - आता विजय माल्यांनी बँकासोबत तडजोड करण्यासाठी सुप्रीम कोर्टासमोर 6,868 कोटींची ऑफर ठेवली आहे. याआधी माल्यांनी 4,400 कोटींची ऑफर दिली होती. माल्यांवर 9 हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आहे. त्याशिवाय त्यांनी पत्नी आणि मुले NRI असल्याने त्यांच्या संपत्तीचा खुलासा करु शकत नसल्याचे म्हटले आहे.

- गुरुवारी माल्यांकडून 6,868 कोटी रुपये जमा करण्याची ऑफर आली. 
- पहिल्या ऑफर पेक्षा यात 2,468 कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत. 
- माल्यांनी कर्ज परतफेडीसाठी तडजोड सुरु केली असली तरी भारतात परत केव्हा येणार याबाबतचा खुलासा केलेला नाही. 
- माल्यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून देण्यात आलेली ही बेस्ट ऑफर आहे. 
- त्यांनी हे देखील सांगितले, की इंधन दरवाढ, वाढीव टॅक्स आणि खराब इंजिन यामुळे किंगफिशर एअरलाइन्सला 6,107 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 
- यामुळे माल्या, त्यांचे कुटुंब आणि त्यांचा यूबी ग्रुप व किंगफिशर फिनवेस्ट तोट्यात गेले होते. 
- माल्यांविरोधात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
 
एनआरआयकडून संपत्तीची मागणी करु शकत नाही 
- माल्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले, की त्यांची तिन्ही मुले - सिद्धार्थ, लियाना आणि तान्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यांची पत्नी 1996 पासून कॅलिफोर्नियात राहात आहे. 
- त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ज्यूरिस्डिक्शनमध्ये येत नाही. 
- पत्नी आणि मुले अनिवासी भारतीय (एनआरआय) असल्यामुळे त्यांच्या परदेशातील संपत्ती आणि आयटी रिटर्नच्या डिटेल्स येथे देऊ शकत नाही. 
- असे असले तरी माल्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे विदेशात 780 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. 
- त्यांनी सांगितले, की भारतात कर्ज घेऊन विदेशात कोणतीही मालमत्ता घेतली नाही किंवा संपत्ती गोळा केलेली नाही. 
- त्यासोबतच माल्यांनी सांगितले, की याआधीच देशाबाहेरील संपत्तीचे विवरण सुप्रीम कोर्टात सीलबंद लिफाफ्यात दिले आहे. 
- माल्यांनी कर्ज परतफेडीसाठी कोर्टात सुरुवातीला 1,591 कोटी रुपये जमा करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. 
- माल्यांचे म्हणणे आहे, की बँकांचे त्यांच्यावर (सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँक सोडून) 4,569 कोटी रुपये कर्ज आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 249

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds