";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अबू सालेमसह 5 दोषींना आज न्यायालय सुनावणार शिक्षा

अबू सालेमसह 5 दोषींना आज न्यायालय सुनावणार शिक्षा

E-mail Print PDF

Add this to your website
 
मुंबई- 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज मुंबईचे विशेष टाडा न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. अरोपी डॉन अबू सालेमसह पाच दोषींना या प्रकरणी शिक्षा सुणावण्यात येणार आहे. 16 जून 2017 रोजी न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा दोसा, त्याच्या भाऊ मोहम्मद दोसा, फिरोज दोसा, रशिद खान, मर्चेंट ताहिर आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवले होते. यातील एक आरोपी मुस्तफा दोसा याचा 28 जूनला तुरुंगातच हार्टअटॅकने मृत्यू झाला होता.

सालेमला देता येणार नाही फाशी...
- गँगस्टर अबू सालेमला पोर्तुगाल येथे आत्मसमर्पण केल्यानंतर भारतात आणण्यात आले. पोर्तुगालसोबत असलेल्या करारानुसार (extradition treaty) न्यायालय सलेमला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावू शकत नाही.
- त्याला जास्तित सास्त 25 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येईल असे मानण्यात येत आहे.
- शिक्षेवर युक्तिवाद करताना प्रॉसिक्यूशने दोषिंना अत्यंत कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केली होती.
 
12 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता...
- 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये एक पाठोपाठ एक असे सलग 12 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात तब्बल 257 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 700 पेक्षा आधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
- या स्फोटांमध्ये मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता.
- पहिल्या टप्पात न्यायालयाने दिलेल्या निर्णयात 100 लोकांना दोषी ठरवण्यात आले होते, त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- या बॉम्बस्फोटांमध्ये 27 कोटी रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. या प्रकरणी 129 जणांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती.
- अजूनही या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टाइगर मेमनसह 27 आरोपी फरार आहेत.
 
हल्यात काय होता अबु सालेमचा रोल?
कोर्टाच्या निर्णयानुसार, अबु सालेम जानेवारी 1993 मध्ये गुजरातमधील भरूच येथे गेला होता. त्याच्या सोबत दाऊद गँगचा आणखी एक साथिदार होता. त्याला हत्यार, स्फोटके आणि दारूगोळा आणण्यासाठी पाठवण्यात आले होते. सालेमला तेथे 9 एके-56, 100 हँड ग्रेनेड आणि गोळ्या देण्यात आल्या. सालेमने एका मारूती व्हॅनमध्ये लपवून हे सर्व साहित्य गुजरातमधून भरूच येथे आणले होते. ही मारूती व्हॅन रियाज सिद्दीकीने उपलब्ध करून दिली होती. ही व्हँन संजय दत्तच्या घरी गेली होती. 16 जानेवारीला सालेम आणखी दोन जणांसोबत संजय दत्तच्या घरी जाऊन 2 एके-56 रायफल्स आणि 250 गोळ्या ठेऊन आला होता. दोन दिवसांनंतर त्याने हे सर्व साहित्य तेथून उचलून नेले. सालेमला बॉम्बस्फोटासाठी स्फोटके आणि इतर हत्यारे गुजरातमधून मुंबईत आणने, स्फोटाचा कट रचणे आणि दहशतवादी हालचालींमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
 
बॉम्बस्फोटापुर्वी झाल्या होत्या 15 बैठका...
- या बॉम्बस्फोट प्रकरणी 27 आरोपी अद्याप फरार आहेत. मुस्तफा दोसा, टायगर मेमन आणि छोटा शकील यांनी पाकिस्तानात ट्रेनिंग कॅम्प घेतले होते. हत्यारांच्या ट्रेनिंगसाठी सर्व हल्लेखोरांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. स्फोटांपुर्वी दुबई आणि इतर ठिकाणी 15 बैठका घेण्यात आल्या होत्या.
 
बाकी 6 जणांचा काय होता रोल?
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 171

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds