";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा; म्हणाला, महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा; म्हणाला, महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for abu salem

मुंबई- मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज (गुरुवारी) विशेष टाडा कोर्टाने अबु सालेम आणि करिमुल्लाह याला आजन्मकारावास तसेच प्रत्येकी दोन लाख रुपये दंड, ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे ऐकताच अबु सालेम म्हणाला, 'महाराष्‍ट्रात माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी तुरुंगात एकटा राहू शकत नाही.' अबू सलेमने त्याला महाराष्ट्राबाहेरील तुरुंगात हलवण्याची मागणी केली आहे. तसेच त्याने निकाह रजिस्टर करण्याचीही कोर्टाकडे यावेळी मागणी केली.

दरम्यान, मंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. 16 जून रोजी मुंबई विशेष टाडा कोर्टाने अबू सलेम समेत सहा जणांना दोषी ठरवले होते. दोषींमध्ये मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चेंट, कलीमुल्‍लाह खान व रियाज सिददीकीचा समावेश आहे. मुस्तफा दोसा हा रायगढमध्ये आरडीएक्स पोहोचवण्यासह आरोपींना ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवणे आणि कट रचने या प्रकरणात दोषी होता. दोसाला भारतात आरडीएक्स आणण्याच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते. परंतु 28 जूनला त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला होता.

सलेम याला गुजरातमधील भरूच येथून मुंबई शस्त्रसाठा पोहोचवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. फिरोज अब्दुल रशीद खान यांचा कट रचणे तसेच निष्पाप नागरिकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. ताहिर मर्चेंट यांचा स्फोट घडवून आणल्याचा कटात सहभाग घेतल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 145

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds