";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- दाऊदची ब्रिटनमधील हजारो कोटींची संपत्ती जप्त, भारत सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश

दाऊदची ब्रिटनमधील हजारो कोटींची संपत्ती जप्त, भारत सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
लंडन - भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीमध्ये त्याच्या वॉरविकशायर येथील हॉटेलसह आलीशान बंगल्यांचा देखील समावेश आहे. भारतीय चलनात दाऊदची तेथील संपत्ती 4 हजार कोटींच्या घरात मानली जात आहे.
 
 
भारत सरकारचे मोठे यश
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. ब्रिटनने दाऊद इब्राहिमची आपल्या देशातील संपत्ती जप्त केली आहे. यात वॉरविकशायर येथील हॉटेल आणि अनेक आलीशान घरांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारने दाऊदला आर्थिक निर्बंधांच्या यादीत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी भारत सरकारने ब्रिटनला याबाबतचे डोझियर देखील सोपविले आहे.
 
 
जगातील दुसरा सर्वात धनाढ्य गॅँगस्टर
फोर्ब्स मॅगझीनच्या आकडेवारीनुसार, जगातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमकडे 6.7 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्याला जगातील दुसरा सर्वात धनाढ्य गँगस्टर म्हटले जाते. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊदची तेथील संपत्ती 4 हजार कोटींच्या घरात आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 33

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds