";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- प्राध्यापकांना 7 वा वेतन आयोग लागू, 50 हजारांपर्यंत वेतनवाढ

प्राध्यापकांना 7 वा वेतन आयोग लागू, 50 हजारांपर्यंत वेतनवाढ

E-mail Print PDF

Add this to your website
 
नवी दिल्ली - देशभरातील ७.५८ लाख महाविद्यालये आणि विद्यापीठांतील प्राध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने घसघशीत दिवाळी भेट दिली आहे. त्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.
 
यामुळे या प्राध्यापकांचे वेतन आता १० हजार ४०० पासून ते ४९ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. वेतनवाढ १ जानेवारी २०१६ पासून लागू होईल. शिफारशी लागू झाल्यानंतर नुकत्याच भरती झालेल्या प्राध्यापकांचेही वेतन २२ ते २८% पर्यंत वाढणार आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले, शिक्षण क्षेत्राकडे प्रतिभावंतांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. या शिफारशी लागू झाल्यानंतर ९८०० कोटींचा बोजा पडेल. यूजीसीने २०१६ मध्ये आपले सदस्य व्ही.एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली वेतन आढावा समिती स्थापली होती. समितीने यंदा फेब्रुवारीत अहवाल सोपवला. त्यात २० टक्क्यांपर्यंत वेतनवाढीची शिफारस केली होती.
 
राज्यातही लवकरच
यूजीसी व केंद्रीय अनुदानप्राप्त संस्थांना तत्काळ फायदा होईल. राज्य सरकार अनुदानित संस्थांना तेथील सरकारकडून शिफारशी मंजूर झाल्यानंतरच सुधारित वेतनमान मिळेल. हा अतिरिक्त बोजाही केंद्रच उचलेल. महाराष्ट्रातील अर्थमंंत्रालय याचा प्रस्ताव केंद्राला पाठवेल.
 
यांना होणार फायदा
- यूजीसी, केंद्रीय अनुदानप्राप्त १०६ विद्यापीठे व कॉलेजचे प्राध्यापक.
- राज्य सरकारकडून अनुदानप्राप्त ३२९ विद्यापीठे व १२,९१२ सरकारी व अनुदानप्राप्त कॉलेज प्राध्यापक.
- आयआयटी, आयआयएमसह इतर ११९ केंद्रीय अनुदानप्राप्त तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांचेही वेतन वाढणार.
 
खात्यामध्ये कधी येईल वाढलेले वेतन
कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता मनुष्यबळ मंत्रालय अधिसूचना जारी करेल. वाढीव वेतन कोणत्या महिन्यात मिळेल, थकबाकी कशी मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे अधिसूचनेतच मिळतील. बहुतेक वेळा थकबाकी ही हप्त्यांत किंवा पीएफमध्ये डिपॉझिटच्या माध्यमातून दिला जाते.
 
कधीपासून लाभ
मनुष्यबळ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, कॅबिनेटमध्ये वेतनवाढीची मंजुरी वित्त समितीकडून दिली आहे. लवकरच याबाबत अधिसूचना वा आदेश जारी केला जाईल. यामुळे केंद्रीय व राज्य विद्यापीठांतील प्राध्यापकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 147

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds