";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- राज्यात 29 लाख नव्या मतदारांची भर, मुंबईत 2 लाख 85 हजार मतदार वाढले

राज्यात 29 लाख नव्या मतदारांची भर, मुंबईत 2 लाख 85 हजार मतदार वाढले

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मतदार नोंदणीची मोहीम राज्यभरात जोरात सुरू आहे. राज्यभरात नवीन मतदारांची संख्या वाढली असून 28 लाख 53 हजार 141 मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई शहर व उपनगरात 2 लाख 85 हजार मतदारांची भर पडली असून ठाण्यात तीन लाख मतदार वाढले आहेत. यामध्ये आणखी भर पडणार असून 31 जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

याआधी सप्टेंबर 2018 मध्ये मतदार यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती तर करीत आहेतच, शिवाय ज्यांची नावे दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदविली गेली आहेत त्यांची नावेही रद्द केली जात आहेत. या मोहिमेंतर्गत राज्यात 35 लाख 88 हजार 12 मतदारांनी नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

राज्यात ठाणे जिह्यात दोन लाख 99 हजार 65 इतके सर्वाधिक नवे मतदार नोंदवण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्ग जिह्यात सर्वात कमी म्हणजे 14,339 मतदारांची नोंद नव्या मतदार यादीत करण्यात आली आहे. मुंबई शहरात 57 हजार 78 तर उपनगरात 2 लाख 28 हजार 660 इतक्या मतदारांची नोंद झाली आहे. नागपुरात 76,815 पुरुषांनी तर 88,444 महिला मतदारांनी नाव नोंदवले आहे. राज्यात 184 तृतीयपंथीयांनीही मतदार यादीत आपले नाव नोंदवले आहे.

7 लाख मतदारांची नावे वगळली
एखादा मतदार मयत झाला असल्यास, वेगवेगळय़ा ठिकाणी दोनदा नाव समाविष्ट असल्यास, अथवा पत्ता बदलणाऱया मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत़ मुंबईतूनच एकूण 1 लाख 5 हजार 30 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी म्हणजे 2014 मध्ये राज्यात 7 कोटी 92 लाख 49 हजार 862 मतदार होते. यामध्ये 4 कोटी 27 लाख 43 हजार 156 पुरुष तर 2 कोटी 67 लाख 14 हजार 578 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds